जुने बायपासनजीकच्या वस्त्यांतील रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:58 IST2019-09-01T23:57:53+5:302019-09-01T23:58:14+5:30
जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचे मुख्य विकासकामांकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जुने बायपासनजीकच्या वस्त्यांतील रस्त्यांची दैना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुने बायपासलगतच्या नागरी वस्त्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. हल्ली रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यातून वाट शोधावी लागत आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचे मुख्य विकासकामांकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर आले आहे. वळण रस्ते चिखलयुक्त आणि निसरडे झाल्यामुळे ते वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे आणि घाण पाणी साचत असताना नगरसेवकांचेही याकडे दुर्लक्ष आहे. खड्डे बुझविण्यासाठी मुरूम ऐवजी किमान गिट्टीची चुरी टाकावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. सतत चिखल होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुझवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.