कुंभारगाव येथे मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST2021-06-06T04:10:23+5:302021-06-06T04:10:23+5:30

कुंभारगाव येथील सुरेश रायबोले (६५) व दिनेश खंडारे (२८) यांच्यात २ जून रोजी रात्री ९ ...

An old man was beaten to death at Kumbhargaon | कुंभारगाव येथे मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

कुंभारगाव येथे मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

कुंभारगाव येथील सुरेश रायबोले (६५) व दिनेश खंडारे (२८) यांच्यात २ जून रोजी रात्री ९ वाजता दरम्यान विडी मागण्याच्या किरकोळ वादातून लोबाझोंबी झाली. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. यात सुरेश रायबोले यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती बाहेरून कुठल्याच जखमा किंवा मार वगैरे दिसत नव्हता. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यानंतर डोके दुखत असल्याने परतवाडा येथील रुग्णालयात सिटीस्कॅन केले असता, डोक्यात दुखापत आढळून आल्याने त्यांला अमरावती येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पुढे शासकीय रुग्णालय नागपूर येथे नेले असता, सुरेश रायबोले यांचा ४ जून रोजी मृत्यू झाला. रहिमापूर पोलिसांनी याआधी आरोपी दिनेश खंडारेविरुद्ध भादंविचे कलम ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता त्या गुन्ह्यात भादंविची कलम ३०२ जोडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: An old man was beaten to death at Kumbhargaon