पाणी स्त्रोतांचे ‘आॅनलाईन मॅपिंग’
By Admin | Updated: December 8, 2014 22:28 IST2014-12-08T22:28:15+5:302014-12-08T22:28:15+5:30
जिल्हा परिषद शाळांचे आॅनलाईन मॅपिंग करण्याचा प्रयत्न फसला असला तरी जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचे मॅपिंग मात्र जोरात सुरू झाले आहे. अँड्रॉईड फोनवरील ‘जीआयएस मॅपिंग (जिओग्राफिकल

पाणी स्त्रोतांचे ‘आॅनलाईन मॅपिंग’
अमरावती : जिल्हा परिषद शाळांचे आॅनलाईन मॅपिंग करण्याचा प्रयत्न फसला असला तरी जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचे मॅपिंग मात्र जोरात सुरू झाले आहे. अँड्रॉईड फोनवरील ‘जीआयएस मॅपिंग (जिओग्राफिकल इन्फरमेशन सिस्टीम) सॉफ्टवेअरच्या मदतीने स्त्रोतांचे स्थान निश्चित करुन त्याची माहिती गुगल मॅपवर लोड केली जात आहे. त्यामुळे पाणी स्त्रोतांचे नेमके ठिकाण, स्त्रोतांचे पाणी कसे आहे, पाण्यातील घटक व त्यांचे प्रमाण यासर्व बाबींची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
ग्रामीण भागात पाण्याचे नेमके किती स्त्रोत आहेत, याची माहिती घेण्यासाठी स्त्रोतांचे कोडींग काही महिन्यापूर्वी करण्यात आले होते. त्यातून स्त्रोतांची निश्चित संख्या मिळाली होती. तसेच कोणत्या स्त्रोतांचे पाणी दूषित आहे, कोणत्या स्त्रोताचा नमुना तपासला गेला आहे. याचीही निश्चित माहिती मिळण्यातील अडचणी दूर झाल्या होत्या.
कोडिंगनंतर आता या स्त्रोतांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. त्यासाठी ‘जीआयएस मॅपींग’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून यामध्ये स्त्रोतांचे गावातील निश्चित ठिकाण नोंदविले जात आहे. त्यानंतर छायाचित्र काढण्यात येऊन ही माहिती थेट इस्त्रो संस्थेकडे पाठविली जाणार आहे.