महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी रस्त्यावर
By Admin | Updated: April 10, 2015 00:31 IST2015-04-10T00:31:44+5:302015-04-10T00:31:44+5:30
महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गुरूवारी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी रस्त्यावर
अमरावती : महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गुरूवारी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तम मानकर यांच्यावर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीरी मंजूर करण्यासाठी दबाव टाकून मारहाणीचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत गटविकास अधिकारी प्रकाश वाघ यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रभार आहे. मात्र, या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील घाटपुरी येथील अंगणवाडी केंद्रात दोन वर्षांपूर्वीच्या पोषण आहारात अनियमितता होती. सदर प्रकरण विधान परिषदेत तारांकित प्रश्नात लावून धरले असता. प्रकाश वाघ यांच्या निलंबनाचे आश्र्वासन सभागृहात देण्यात आले. या प्रकरणात वाघ यांचा कसलाही दोष नसताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.त्यामुळे ही कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात विभागीय अध्यक्ष सुनील निकम, सचिव विनोद खेडकर, के.एम अहमद, अरूण मोहोड, पंकज इंगळे, प्रिती देशमुख, प्रमोद कापडे, संजय जोल्हे, किशोर काळे, अरविंद गुळदे, नरेंद्र धारगे, एस .बी. गुहे, रामकृष्ण पवार, बी.एस. रेंगळे, आर के.जोशी, सूरज गोहाड, प्रकाश तट्टे, बाळासाहेब रायबोले, तुकाराम टेकाडे, एस.पी.थोरात, दिलीप मानकर, सतीश खानंदे, पी.आर.राठोड, भालचंद्र बहिरम, बी.डब्ल्यू. चव्हाण, पी. आर.वाघ, डी.ए. पतंगराव, जे.पी बाबरे, बी.डब्ल्यू. कनाटे, सुधाकर दंवडे, एस.व्ही.देशमुख, मनोहर खिल्लारी, एस. एच.पराते यांच्यासह विभागातील सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, प्रवीण ठाकरे यांनी आंदोलनाला समर्थन दिले. (प्रतिनिधी)