अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे धडे

By Admin | Updated: February 19, 2017 00:10 IST2017-02-19T00:10:33+5:302017-02-19T00:10:33+5:30

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवार २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहे.

Officers and employees learn counting lessons | अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे धडे

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे धडे

अमरावती : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवार २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. मतमोजणी सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना १८ फेब्रुवारीला टाऊन हॉल येथे मतमोजणीसंदर्भात प्रथम प्रशिक्षण देण्यात आले.
मतमोजणी कशी करायची याचे प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण करण्यात आले. टेबल कसे लागणार आहे याचीही माहिती देण्यात आली. मनपातर्फे यावेळी देण्यात येणारे साहित्य तसेच सेवा याचीही माहिती देण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. दुसरे प्रशिक्षण २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी मतमोजणी संबंधात सर्व नियम संबंधितांना सांगण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. खिल्लारे, पी. एम. कापडे, गौतम वालदे, जी. जी. मावळे, डी. आर. खाडे, राजेंद्र भुयार, आर. सी. लोखंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आर.ए. लंके, सचिन पाटील, रवि काळे, वैशाली पाथरे, शिल्पा बोबडे, शरयू आडे, पी. यु. गिरी, निवेदिता घार्गे, सचिन बोंद्रे, श्रीकांत चव्हाण, सुनील पकडे, सोनाली यादव, मंगेश वाटाणे, योगेश पिठे, सुहास चव्हाण, नितीन भटकर, लक्ष्मण पावडे, रवींद्र पवार, प्रमोद इंगोले, टोपरे, दीपक खडेकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Officers and employees learn counting lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.