शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अधिकारी- ठेकेदाराने हडपले १.८० कोटींचे तेलपंप, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 20:52 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथिल प्रदेशिक कार्यालयात तब्बल १.८० कोटी रुपयांचा अपहार उघड झाला आहे.

- पंकज लायदेधारणी (अमरावती) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथिल प्रदेशिक कार्यालयात तब्बल १.८० कोटी रुपयांचा अपहार उघड झाला आहे. आदिवासी बांधवांना सिंचनासाठी मंजूर तेलपंप न देता ती रक्कम तत्कालीन अधिकारी कर्मचारी व ठेकेदारानेच गिळंकूत केले. याप्रकरणी धारणी कार्यालायातील दोन तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांसह दोन कर्मचारी व एका ठेकेदाराविरुद्ध धारणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास गुन्हा दाखल केला. सन २००४ ते २००९ या कालावधीत हा अपहार करण्यात आला.  तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक शाम नारायण मुंड व पी. आर. वाघमारे, नामदेव नथ्थुजी मेश्राम, चंद्रकांत भलावी व आकाश दिप विद्यूत कामगार सरकारी संस्था नंदुरबारचे ठेकेदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धारणीचे विद्यमान प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलकर यांनी ही तक्रार नोंदविली.              एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत आदिवासी बांधवाना   गॅस यूनिट व तेलपंप मोफत वितरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या अखत्यारितील  प्रादेशिक व्यवस्थापक धारणी यांच्याकडे होती. त्यानुसार येथिल प्रदेशिक कार्यालयास आदिवासी बांधवाना वितरित करण्यासाठी २२०९  तेलपंप प्राप्त झाले. सिंचनासाठी जनरेटरप्रमाणे काम करणाºया या तेलपंपामुळे आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार होते. मात्र धारणी प्रादेशिक कार्यालायात त्या कालावधीत कार्यरत चारही लोकसेवकांनी ठेकेदारशी संगणमत करुन एकृर तेलपंपापैकी ९१३ तेलपंपाचे वितरणच केले नाही. १ कोटी ८० लाख ७५ हजार १७ रुपये किमतीच्या त्या तेलपंपांचा अपहार केला. 

चौकशी अहवालानंतर तक्रार ९१३ आदिवासी बांधवाना तेलपंप  वाटप करण्यात आले नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी करण्यात आल्या होत्या. या अपहाराच्या चौकशीसाठी राज्यशासनाने गायकवाड समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाअंती सन २००४ ते २००९ या कालावधीतील प्रादेशिक व्यवस्थापकासह कर्मचारी व एका ठेकेदारास दोषी ठरविण्यात आले.  शुक्रवारला उशिरा रात्री याबाबत गुन्हा  दाखल करण्यात आला. २२०९ तेलपंपापैकी ९१३ तेलपंपाचे वितरण न करता त्या रकमेचा अपहार करण्यात आल्याची तक्रारीत नोंद आहे.  विलास कुलकर्णी, ठाणेदार, धारणी पोलिस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार