बोरवघडमध्ये विकासकामात बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST2021-03-08T04:13:41+5:302021-03-08T04:13:41+5:30

------------------------ फोटो पी ०७ टेंभुरखेडा टेंभुरखेडा : येथील चेतन दवंडे हा पोतुर्गाल येथे मल्लखांब स्पर्धेत सहभागी होणार ...

Obstruction of development work in Borvaghad | बोरवघडमध्ये विकासकामात बाधा

बोरवघडमध्ये विकासकामात बाधा

------------------------

फोटो पी ०७ टेंभुरखेडा

टेंभुरखेडा : येथील चेतन दवंडे हा पोतुर्गाल येथे मल्लखांब स्पर्धेत सहभागी होणार आहे. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला टेंभुरखेडा ग्रामपंचायत कार्यालयाकडून २० हजार रुपयांचा धनादेश सरपंच रोशनी निंभोरकर व सचिव सतीश देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेंद्र सोनुले उपस्थित होते.

------------

फोटो पी ०७ ठोंबरे

बेबी ठोंबरे यांचे निधन

कुऱ्हा : येथील नारायण फकीरजी ठोंबरे यांच्या पत्नी बेबी ठोंबरे (६१) यांचे ४ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, मुलगा व बराच आप्तपरिवार आहे.

-----------

फोटो पी ०७ कोकाटे

संजय कोकाटे

टाकरखेडा संभू : लसनापूर (ता. चांदूर बाजार) येथील सरपंच संजीव रामकृष्ण कोकाटे (५३) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

-----------

फोटो पी ०७ नागापुरे

राजेश नागापुरे

आसेगाव पूर्णा : नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश नागापुरे (४७, आसेगाव पुर्णा) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. पूर्णा नदीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.

-------------

विद्यापीठात आज महिला सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर भूषवतील. प्रमुख वक्ते म्हणून पोलीस आयुक्त आरती सिंह यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

--------

Web Title: Obstruction of development work in Borvaghad