टोलवर वाहनांच्या रांगामुळे छोट्या वाहनांना अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:11+5:302020-12-11T04:39:11+5:30

पान ३ फोटो पी १० नांदगाव पेठ नांदगाव पेठ : टोलनाक्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा असल्याने दुचाकी व तीनचाकी ...

Obstacles to small vehicles due to queues of vehicles on the toll | टोलवर वाहनांच्या रांगामुळे छोट्या वाहनांना अडथळा

टोलवर वाहनांच्या रांगामुळे छोट्या वाहनांना अडथळा

पान ३ फोटो पी १० नांदगाव पेठ

नांदगाव पेठ : टोलनाक्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा असल्याने दुचाकी व तीनचाकी वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात झाल्याने नांदगाववासी आक्रमक झाले होते. गुरुवारी गावकरी व ऑटोचालकांनी निवेदन देऊन टोल व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसांत अडथळा दूर करून वाहनधारकांसाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन टोल व्यवस्थापक नरेंद्र पेमारे यांनी गावकऱ्यांना दिले.

येथे असलेल्या आयआरबी टोल नाक्यावर दोन्ही बाजूला दररोज गर्दी होत असल्याने नि:शुल्क लाईनमधून जाणाऱ्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेकदा ऑटोचालकांनी हा मुद्दा उपस्थित केला. दोन दिवसांत दुचाकी घसरून याठिकाणी अपघात झाल्याने भाजप कामगार आघाडी अध्यक्ष सत्यजित राठोड आणि ऑटो संघटनेचे अध्यक्ष प्रवीण झोडगे यांनी टोल व्यवस्थापनाला धारेवर धरत रस्ता दुरुस्ती, दुचाकी, तीनचाकी वाहनांना जाण्यासाठी सुरक्षित रस्ता तसेच सर्विस रस्त्यावर असलेले खड्डे दुरुस्तीची मागणी केली. यावेळी भाजप तालुका सरचिटणीस राजू चिरडे, अनिल हिवे, रितेश नागापुरे, किशोर कोठार, अतुल तलमले,अ. मजीद सादिक, अभिजित जामठे, प्रवीण डोईफोडे, राजू केडिया, अब्दुल वाहिद, मोहित साखरकर, अनिल भगत, दिनेश वंजारी, विकी सुंदरकर, रुपेश पोटफोडे यांचेसह भाजप आणि ऑटो संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Obstacles to small vehicles due to queues of vehicles on the toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.