पोषण आहाराची ‘टेस्ट’ राहणार बेस्टच; पथकांची नजर!

By जितेंद्र दखने | Published: October 27, 2023 07:24 PM2023-10-27T19:24:50+5:302023-10-27T19:26:02+5:30

जिल्हाभरातील शाळांमध्ये जाऊन करणार तपासणी

Nutritional 'test' will be the best; Teams look! | पोषण आहाराची ‘टेस्ट’ राहणार बेस्टच; पथकांची नजर!

पोषण आहाराची ‘टेस्ट’ राहणार बेस्टच; पथकांची नजर!

अमरावती : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार जाऊन करणार तपासणी दिला जावा, यासाठी भरारी व दक्षता पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांना कोणत्याही शाळेत जाऊन आता पोषण आहार तपासण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहावी, विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे व यातून त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित व्हावी, यासाठी केंद्र शासन व राज्य, शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते आहे.

वर्षाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील २ हजार ३८८ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या २ लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ मिळवून देण्यात येतो. या शालेय पोषण आहार तपासणीसाठी सर्व मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना भरारी पथके नियुक्त करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये दरमहा किमान १० शाळांची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे, तर प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना महिन्यातून किमान दोन भेटी देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भरारी पथकांनी शाळा तपासणी केलेल्या शाळांच्या संख्येबरोबरच शाळांची नावेही सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पथकांनी खरेच शाळांची तपासणी केली का? याची शहानिशा केली जाणार आहे.

जिल्ह्याची स्थिती
एकूण- २३८८
१ते ५ विद्यार्थी -१४३२२३
६ ते ८ चे विद्यार्थी-१०३२३३

शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथके तपासणीसाठी गठीत केले आहेत. याशिवाय जिल्हास्तरावरही पथक आहे. या पथकामार्फत पोषण आहाराची तपासणी केली जाते. त्यात दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाईसुद्धा केली जाते.
नरेंद्र गायकवाड, पोषण आहार अधीक्षक

Web Title: Nutritional 'test' will be the best; Teams look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.