पोषण आहारात विद्यार्थ्यांचे पोषण, शिक्षकांचे शोषण
By Admin | Updated: September 21, 2014 23:43 IST2014-09-21T23:43:48+5:302014-09-21T23:43:48+5:30
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असली तरी शिक्षकांचे शोषण करणारी ठरत आहे.

पोषण आहारात विद्यार्थ्यांचे पोषण, शिक्षकांचे शोषण
सुखदेव पवार - चमक
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असली तरी शिक्षकांचे शोषण करणारी ठरत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली की, आजची खिचडी कशी झाली. सामूहिक उत्तर आले, चांगली झाली सर. पण, या उत्तरातूनच एका इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने धीटपणे उभी राहून कृतज्ञता व्यक्त केली. तिने डोळ्यातील आस्वाने ओघड पुसत हृदयातील शब्दाला वाचा फोडली. सर, ''खिचडी चांगली नाही. एक महिन्यापासून मी नुसती खिचडीवर जगते आहे. रविवार आम्हाला उपवास जातो.'' यातून एक सत्य बाहेर आले की, ही मुलगी शिक्षणासोबतच पोषण आहारासाठी पण शाळेत येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाभदायी योजनेतील चांगली योजना म्हणून पोषण आहार योजना राज्यभर राबविली जात आहे.
या योजनेतील अडथळे शोधण्यासाठी किंवा त्याहीपेक्षा ती योजना अधिक चांगल्या रितीने कशी राबविली जाईल यासाठी नुकताच अमरावती जिल्ह्यात राज्य समीक्षा पथकाची स्थापना केली आहे.
या पथकाच्या निरीक्षणातूून अनेक गोष्टी बाहेर येतील व त्यावर योग्य त्या उपाययोजना शासनाला करता येती, यामागील उद्देश. ही योजना राबवीत असताना शिक्षकांवर टाकलेली जबाबदारी विद्यार्थ्यांच्या आहारासंबंधीत असल्यामुळे चांगला सकस आहार कसा देता येईल, ही शिक्षकांची धडपड असते. हे सर्व करीत असताना त्याचे शैक्षणिक कार्य काहीअंशी बाजूला राहते. त्यासाठी शिक्षकांना शैक्षणिक कार्य बाजूूला ठेवून पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांना वाटप होणाऱ्या पोषण आहारावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष होते. यासाठी पोषण आहार योजना राबविण्यासाठी दुसरी यंत्रणा शासनाने कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरुलागली आहे.
विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण होण्यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता आहे. निरनिराळ्या प्रकारचे धान्य जर शासन पाठवीत राहिले तर दररोजचा मेनू बदलत राहील. कार्यान्वित असलेली किचन शेडची मागणी त्वरित पूर्णत्वास गेल्यास धान्य शिजविण्यासाठी स्वच्छ परिसर प्राप्त होऊ शकेल. ही योेजना राबविताना पुरक आहारावर येणारा व भाजीपाला वापरताना कसरत करावी लागते. ही योजना चांगली राबविण्यासाठी स्वयंपाकीन व मदतनीस यांच्या वेतनात वाढ केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.