शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

अमरावती शहरात फिरताहेत विनाक्रमांकाची व्हीआयपी वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:00 IST

Amravati : शहरातील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, स्टीकर व काही चिन्हांचा वापर

मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी लागू केलेल्या आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रशासनाने मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. यामध्ये विशेषतः स्थिर निगराणी करणारी पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करतात, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पैशांचा वापर आणि अशा प्रकारची अनियमितता रोखता येईल. शहराच्या विविध प्रवेश मार्गांवर नाकेबंदी लावून, वाहने थांबवून त्यांची 'इन कॅमेरा' तपासणी केली जात आहे. या सर्व उपाययोजनांमुळे प्रशासनाची करडी नजर आहे, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी शहरात काही विनानंबरची वाहने फिरताना आढळून येत आहेत. ही वाहने अनेकदा 'व्हीआयपी' स्टिकर व काही चिन्हांचा वापर करून येत आहेत. 

ज्यामुळे या वाहने त्याच तपासणीमधून सुटून जात आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी का केली जात नाही आणि प्रशासन यावर योग्य प्रतिसाद का देत नाही? असादेखील प्रश्न या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे. 

व्हीआयपी स्टीकर लावून वाहने सुसाट जिल्ह्याच्या प्रमुख मार्गावर २४ ठिकाणी स्थिर निगराणी पथके, ६० फ्लाइंग स्कॉड, ३४ व्हिडीओ सर्वेक्षण टीम आहेत. शिवाय, इतर पथके सुद्धा प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. निवडणूक प्रक्रियेत पैशांचा गैरवापर होणार नाही, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत.

शहराच्या प्रमुख मार्गावर स्थिर निगराणी पथके शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर स्थिर निगराणी पथकांची नजर आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. याठिकाणी इन कॅमेरा तपासणी होत असून, सीसीटीव्हीचीदेखील नजर आहे. तरी सुद्धा शहरात विनानंबरची व्हीआयपी स्टीकर लावून वाहने फिरत आहेत. शहरात या वाहनांनी स्थिर निगरानी पथकांची नजर चुकवून शहरात प्रवेश केला कसा? असा प्रश्न आहे.

"राज्य परिवहन विभागाच्या वतीने स्कॉड निर्माण केले आहे. विनानंबरची वाहने दिसत असेल तर त्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाही करण्यात येते."- उर्मिला पवार, आरटीओ

टॅग्स :AmravatiअमरावतीCode of conductआचारसंहिता