संक्रमणमुक्तांचा आकडा ९५ टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:53+5:302021-06-09T04:14:53+5:30

अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रोज संक्रमितांच्या तुलनेत संक्रमणमुक्तांची संख्या जास्त आहे. सोमवारी ४३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ...

The number of transition free has crossed 95 percent | संक्रमणमुक्तांचा आकडा ९५ टक्के पार

संक्रमणमुक्तांचा आकडा ९५ टक्के पार

अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रोज संक्रमितांच्या तुलनेत संक्रमणमुक्तांची संख्या जास्त आहे. सोमवारी ४३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ८९,५९९ वर पोहोचली असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. ही टक्केवारी ९५.०३ टक्के आहे.

जिल्ह्यात यंदाची सर्वात कमी ३.५६ टक्के पॉझिटिव्हिटी सोमवारी नोंदविली गेली. ५,८४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, ही दिलासाजनक नोंद झालेली आहे. याशिवाय सोमवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,५०६ वर पोहोचली आहे. यात महापालिका क्षेत्रात मृत्यसंख्या निरंक आहे. नवे २०८ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९४,२०८ झालेली आहे.

बॉक्स

सोमवारी २४ तासांतील मृत्यू

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ६० वर्षीय महिला, परतवाडा, ८० वर्षीय पुरुष, गायवाडी, दर्यापूर, ६० वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, ६० वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर, ६० वर्षीय पुरुष, सुरळी, चांदूर बाजार या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

Web Title: The number of transition free has crossed 95 percent