शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

By गणेश वासनिक | Updated: April 13, 2023 18:04 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी निर्णय, मजुरांची भटकंती थांबणार, क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपविली जबाबदारी

अमरावती : राज्याच्या वन विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रमांसाठी मजुरांकडून कामे केली जातात. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मजुरांना वेळेत मजुरी मिळत नाही. तथापि, आता वन विभागात कार्यरत मजुरांना महिन्याभराचा आत मुजरी दिली जाणार आहे. त्याकरिता क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वनविभागाच्या विविध शाखेअंतर्गत करण्यात येणारी कामे, कार्यक्रम आणि अनिवार्य योजना राबविल्या जातात. राज्यस्तरीय योजना, जिल्हास्तरीय योजना, केंद्र पुरस्कृत योजना, केंद्रीय योजना, कॅम्पा आदींचा समावेश आहे. परंतु, मजुरांना वेळेत मजुरी मिळत नसल्याची ओरड आहे. मजुरांअभावी अनेक योजना, उपक्रम पूर्णत्वास गेले नाहीत, असे अगोदर अनेकदा प्रकार घडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मजुरी अदा केली जाईल, असे महसूल व वन विभागाने १० एप्रिल २०२३ रोजी शासनादेश जारी केला आहे. यापूर्वी मजुरांना पाच ते सहा महिन्यापर्यंत मजुरी मिळत नव्हती. आता राज्य शासनाने नवी गाईड लाईन निश्चित केल्यामुळे वन विभागात मजुरांची मजुरी मिळत नसल्याची ओरड नामशेष होणार आहे. 

मजुरांमार्फत ही होतात कामे

वन विभागात विविध क्षेत्रीय घटकांमार्फत वनक्षेत्रांवर वृक्ष लागवड, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन आणि व्यवस्थापन यासह कार्य आयोजनेतील व्यवस्थापन आराखड्यातील तरतुदीनुसार कामे केली जातात. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वनेतर क्षेत्रासह दुर्गम, आदिवासी भागात रोजंदारीवर कामे केली जातात. नव्या निर्णयामुळे मजुरांना ठराविक काळात रोजंदारी दिली जाणार आहे.क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

वन विभागात मजुरांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कामांचा कृती आराखडा, अर्थसंकल्पीय वार्षिक अंदाजपत्रक, वार्षिक योजना वा वेळेवर येणारी कामांसाठी प्रस्ताव तयार करणे, कामांचे अंदाजपत्रक तयार करुन सक्षम प्राधिकाऱ्याकडून  तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे, कामांची मंजुरी मिळताच कामांना निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही करणे, कामास निधी मिळल्यानंतर उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी अथवा वन परिक्षेत्राधिकारी यांचे मंजुरीनंतरच कामे प्रारंभ करावी लागेल. - अन्यथा डीएफओ, एसीएफ, आरएफओंवर कारवाई

सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षात वन विभागात विविध घटकांमार्फत वन व वनेतर क्षेत्रावर करण्यात येणाऱ्या कामांवरील सर्व मजुरांना एक महिन्याचा आत मजुरी अदा करणे अनिवार्य आहे. मजुरी देण्यास दिरंगाई झाल्यास उपवसंरक्षक, सहायक वनसंरक्षक अथवा वन परिक्षेत्राधिकारी यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावतीLabourकामगार