आता 'सर्च कर डॉट कॉम' वर मिळणार रक्त

By Admin | Updated: June 15, 2014 23:16 IST2014-06-15T23:16:26+5:302014-06-15T23:16:26+5:30

रक्ताची आवश्यकता भासल्यास आता एका क्लिकवर रक्तदात्यांची यादी मिळणार आहे. दोन युवकांच्या स्तुत्य उपक्रमातून ही माहिती 'सर्च कर डॉट कॉम' या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Now search on 'search.com dot com' blood | आता 'सर्च कर डॉट कॉम' वर मिळणार रक्त

आता 'सर्च कर डॉट कॉम' वर मिळणार रक्त

वैभव बाबरेकर - अमरावती
रक्ताची आवश्यकता भासल्यास आता एका क्लिकवर रक्तदात्यांची यादी मिळणार आहे. दोन युवकांच्या स्तुत्य उपक्रमातून ही माहिती 'सर्च कर डॉट कॉम' या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कोणत्याही नागरिकांना रक्ताची आवश्यकता भासल्यास एक तर तो व्यक्ती शासकीय रक्तपेढी अथवा खासगी रक्तपेढीकडे धाव घेते; मात्र त्या मोबदल्यात त्या व्यक्तीजवळ रक्तदान करणाऱ्याची गरज भासते. तसेच रक्तदाता नसल्यास रक्ताची मोठी किंमतही मोजावी लागते. रक्तदाते मिळविण्याकरिता अनेकांना वणवण भटकावेही लागते. ज्या रक्तगटाचा व्यक्ती असेल त्याला त्याच गटातील रक्तदात्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक जणांना रक्त वेळेवर मिळत सुध्दा नाही. रक्तदाता मिळल्यास त्या व्यक्तीला रक्तपेढीत नेवून रक्तदान करावे लागते. या सर्व प्रक्रियेला एक ते दोन तास वेळ लागतोच. मात्र आता रक्तांसाठी वणवण भटकणाऱ्यांना काळजी करायची आवश्यकता नसून फक्त इंटरनेटच्या माध्यमातून सर्च कर डॉट कॉम या बेवसाईटवर जाण्याची आवश्यकता आहे. सर्च कर डॉट कॉमवर सर्च करुन आपण रक्तदात्यांच्या रक्तगटानुसार व्यक्तीचा शोध घेऊ शकतो. काही दिवसांपासून विक्रम गेडाम व सांकेत देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी रक्ताचे महत्त्व समजून हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. या दोन युवकांनी इंटनेटरच्या माध्यमातून सर्च कर डॉट कॉम सुरु केला असून त्या माध्यमातुन रक्तदात्यांची यादी प्रसिध्द केली जात आहे. त्यामुळे एका क्लिकवर संपूर्ण रक्तगटातील रक्तदात्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्च कर डॉट कॉम सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६० गरजवंतांना रक्तदात्यांची माहिती मिळाली आहे.

Web Title: Now search on 'search.com dot com' blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.