लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन'ची अंमलबजावणी जिल्ह्यात १ मेपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात समाविष्ट १४ ही तालुक्यांतील कुठल्याही गावचे / मौज्यामधील दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येत आहे.
शासनाच्या १०० दिवसांचे कृती कार्यक्रमात 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' मुख्यमंत्री जीनीहोते व पासून १ निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्धस्तरावर यंत्रणा राबवून 'एक जिल्हा एक नोंदणी' हा उपक्रम १ मेपासून सुरू केला आहे. यासाठी शासनाने मान्यता प्रदान केल्यामुळे आता एका जिल्ह्यात समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावचे/मौज्याचे दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येत आहे.
यापूर्वी संबंधित तालुक्यात नोंदणी करणे अनिवार्ययापूर्वी प्रत्येक तालुक्याचे दस्त त्याच तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविणे बंधनकारक होते. आता मात्र 'एक जिल्हा, एक नोंदणी' अंतर्गत मात्र जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचा दस्त हा जिल्ह्यातील कुठल्याही अन्य तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविता येतो. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची सुविधा झालेली आहे.
पदनामात बदल, आता कार्यक्षेत्र जिल्हा'एक जिल्हा, एक नोंदणी'साठी शासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकारी यांचे पदनाम 'सह दुय्यम निबंधक' असे केले. शिवाय सर्व नोंदणी अधिकारी यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण 'जिल्हा' करण्यात आले आहे. तसे आदेश व कायद्यात सुधारणा करण्यात आली. सूची क्रमांक २ वर गावचे नाव, तालुका व जिल्हा नमूद असल्याने यात सुविधा झालेली आहे.
उपक्रम यशस्वी आता पुढची तयारीहा उपक्रम यशस्वी झाल्यावर त्या पुढील काळात 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' यावर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. नोंदणी विभागाच्या निर्णयामुळे नागरिकांना सुविधा झालेली आहे.
"एक जिल्हा, एक नोंदणी' ही 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन'ची पहिली पायरी आहे. आता जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचे दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील नगरिकांना त्यांच्या सोईच्या तालुक्यात करता येईल."- अनिल भा. औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक