शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 आता सिंचनासाठी नलिका वितरणाला प्राधान्य,  जलसंपदाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:44 IST

सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे.

 अमरावती -  सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे. आता सिंचन प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

वितरण प्रणाली व सिंचन प्रणाली ह्या जरी दोन भिन्न बाबी असल्या तरी वितरण प्रणालीद्वारेच पाणी क्षेत्रापर्यंत पोहोचवणे त्यांनतर पाटच-या किंवा तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पाणी कार्यान्वित करणे अभिप्रेत आहे. नलिका वितरण प्रणाली स्वीकारली असली तरी सिंचनाची कोणतीही पद्धती अवलंबिता येते. मात्र उपलब्ध पाणीसाठा व लागवडयोग्य क्षेत्र विचारात घेता सूक्ष्म सिंचन हेच जलसंपदा विभागाचे दूरगामी उद्दिष्ट आहे. जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लाभक्षेत्रातील जमिनीचा उतार तीव्र असल्यास कालव्यावर उपलब्ध ऊर्जेचा व्यय करण्यासाठी धबधब्याची शृंखला बांधावी लागते. यावर आगाऊ खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात नलिका वितरण प्रणाली संकल्पित करण्यास वाव आहे व सर्वसाधारणपणे जमिनीचा उतार १:५०० पेक्षा असल्यास गुरूत्वाकर्षण ऊर्जेद्वारे नलिका वितरण व्यवहार्य बाब आहे.लाभक्षेत्रातील जमिनीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यास कालवा बांधकामाचा खर्च वाढतो व शेतच-यांवरील धबधब्याचा खर्च वाढतो अशा प्रकरणी नलिका वितरण व्यवहार्य बाब ठरणारी असल्याचे जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 वहन व्ययाची बचत, कार्यक्षमतेमध्येही वाढनवीन प्रकल्पांच्या बाबतीत पांरपरिक कालवा वितरण प्रणाली भूसंपादनाच्या खर्चामुळे महाग पडू शकते, अशा प्रकरणी अभियांत्रिकी निकषानुसार नलिका वितरण प्रणाली तांत्रिक व आर्थिकदृट्या व्यवहार्य ठरणार आहे. तसेच नलिका वितरणामुळे वहन व्ययाची बचत होणार आहे व पाणी वापराची कार्यक्षमताही वाढणार आहे. काळ्या मातीच्या लाभक्षेत्रात पाया खोल जात असल्याने कालव्यावरील बांधकामाचा भांडवली खर्च जास्त येतो व अस्तरीकरणाचा खर्चही अधिक असल्याने अशा प्रदेशात तांत्रिक निकषानुसार नलिका वितरण प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Waterपाणी