शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

आता पीसीसीएफ करणार आरएफओंच्या बदल्या

By admin | Updated: December 6, 2014 00:42 IST

मंत्रालयाच्या इशाऱ्यावर होणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियतकालीन बदल्यांचे ...

अमरावती : मंत्रालयाच्या इशाऱ्यावर होणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियतकालीन बदल्यांचे अधिकार आता प्रधान मुख्यसंरक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मलईदार जागा काबीज करण्यासाठी वनमंत्रालयातील ‘लॉबिंग’ प्रकाराला आता 'ब्रेक' लागणार आहे. यामुळे कोण, कोठे योग्य? हे वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना ठरविणे सुकर होईल. येत्या एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे.आरएओ, एसीएफ, विभागीय वन अधिकाऱ्यांच्या बदली करण्याबाबतचे सुधारित आदेश राज्याच्या महसूल व वनमंत्रालयाने काढले आहेत. वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही बाबींवर स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रालयाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने आरएफओ, एसीएफ विभागीय वन अधिकाऱ्यांच्या नियतकालिन बदल्या यापुढे प्रधान मुख्यसंरक्षक कार्यालयातून होणार आहे. यापूर्वी आमदार, मंत्र्यांना हाताशी धरुन बदल्यांसाठी आरएफओ, एसीएफ दर्जाचे अधिकारी मलईदार जागेवर आसनस्थ होण्यासाठी वाटेल ती रक्कम मोजायचे. मात्र आता कोणत्या जागेवर कोण अधिकारी कार्यक्षम? हे तपासण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना असल्याने योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग खुला झाला आहे. नव्या शासनकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रामाणिक काम करणाऱ्या वनअधिकाऱ्यांसाठी अतिशय योग्य असाच म्हणावे लागेल. मात्र या निर्णयाची पारदर्शकपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. वनविभागात वनवर्तुळ अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे असून सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या परिसरात बदली करुन घेण्यासाठी काही आरएफओंची ख्याती आहे. त्यापैकी काही वर्षांनुवर्षे विदर्भातच ठाण मांडून आहेत. विशेषत: अमरावती सोडून ते एकदाही बाहेर जिल्ह्यात बदलून गेले नाहीत. मंत्रालयात बड्या अधिकाऱ्यांना एकदा हाताशी धरुन त्यांची मर्जी सांभाळली की, आपल्या सोयीनुसार आणि मलईदार जागा सहजतेने काबीज करणारे आरएफओ विदर्भात बस्तान मांडून आहेत. परंतु मंत्रालयातून दबावतंत्र व मलईदार जागा बळकावण्यासाठी बदली दरम्यान ‘लॉबिंग’ करणाऱ्या आरएफओ, एसीएफची यादी नागपूर येथील प्रधान मुख्यसंरक्षक कार्यालयाला ठाऊक आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे पैशाच्या जोरावर मोक्याच्या जागा बळकावून कार्यक्षम वनअधिकाऱ्यांना कर्तव्यापासून दूर सारणाऱ्या भ्रष्ट वनअधिकाऱ्यांचे आता नियतकालीन बदल्यांमध्ये काहीही चालणार नाही, हे खरे आहे. कारण प्रधान मुख्यसंरक्षक हे उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक अशा पदावर कार्यरत असताना कोण आरएफओ, एसीएफ पदासाठी कर्तव्यक्षम? याची चांगली जाणीव असल्यामुळे बदलीदरम्यान याचीही चाचपणी होईल. बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी आणि चांगल्या वनअधिकाऱ्यांना न्याय मिळावा, हे वन मंत्रालयाच्या नव्या आदेशाचे धोरण आहे. या आदेशाची येत्या एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरविले आहे.