आता पीसीसीएफ करणार आरएफओंच्या बदल्या

By Admin | Updated: December 6, 2014 00:42 IST2014-12-06T00:42:47+5:302014-12-06T00:42:47+5:30

मंत्रालयाच्या इशाऱ्यावर होणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियतकालीन बदल्यांचे ...

Now PCCF transfers RFs | आता पीसीसीएफ करणार आरएफओंच्या बदल्या

आता पीसीसीएफ करणार आरएफओंच्या बदल्या

अमरावती : मंत्रालयाच्या इशाऱ्यावर होणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियतकालीन बदल्यांचे अधिकार आता प्रधान मुख्यसंरक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मलईदार जागा काबीज करण्यासाठी वनमंत्रालयातील ‘लॉबिंग’ प्रकाराला आता 'ब्रेक' लागणार आहे. यामुळे कोण, कोठे योग्य? हे वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना ठरविणे सुकर होईल. येत्या एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे.
आरएओ, एसीएफ, विभागीय वन अधिकाऱ्यांच्या बदली करण्याबाबतचे सुधारित आदेश राज्याच्या महसूल व वनमंत्रालयाने काढले आहेत. वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही बाबींवर स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रालयाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने आरएफओ, एसीएफ विभागीय वन अधिकाऱ्यांच्या नियतकालिन बदल्या यापुढे प्रधान मुख्यसंरक्षक कार्यालयातून होणार आहे. यापूर्वी आमदार, मंत्र्यांना हाताशी धरुन बदल्यांसाठी आरएफओ, एसीएफ दर्जाचे अधिकारी मलईदार जागेवर आसनस्थ होण्यासाठी वाटेल ती रक्कम मोजायचे. मात्र आता कोणत्या जागेवर कोण अधिकारी कार्यक्षम? हे तपासण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना असल्याने योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग खुला झाला आहे. नव्या शासनकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रामाणिक काम करणाऱ्या वनअधिकाऱ्यांसाठी अतिशय योग्य असाच म्हणावे लागेल.
मात्र या निर्णयाची पारदर्शकपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. वनविभागात वनवर्तुळ अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे असून सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या परिसरात बदली करुन घेण्यासाठी काही आरएफओंची ख्याती आहे. त्यापैकी काही वर्षांनुवर्षे विदर्भातच ठाण मांडून आहेत. विशेषत: अमरावती सोडून ते एकदाही बाहेर जिल्ह्यात बदलून गेले नाहीत. मंत्रालयात बड्या अधिकाऱ्यांना एकदा हाताशी धरुन त्यांची मर्जी सांभाळली की, आपल्या सोयीनुसार आणि मलईदार जागा सहजतेने काबीज करणारे आरएफओ विदर्भात बस्तान मांडून आहेत. परंतु मंत्रालयातून दबावतंत्र व मलईदार जागा बळकावण्यासाठी बदली दरम्यान ‘लॉबिंग’ करणाऱ्या आरएफओ, एसीएफची यादी नागपूर येथील प्रधान मुख्यसंरक्षक कार्यालयाला ठाऊक आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे पैशाच्या जोरावर मोक्याच्या जागा बळकावून कार्यक्षम वनअधिकाऱ्यांना कर्तव्यापासून दूर सारणाऱ्या भ्रष्ट वनअधिकाऱ्यांचे आता नियतकालीन बदल्यांमध्ये काहीही चालणार नाही, हे खरे आहे.
कारण प्रधान मुख्यसंरक्षक हे उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक अशा पदावर कार्यरत असताना कोण आरएफओ, एसीएफ पदासाठी कर्तव्यक्षम? याची चांगली जाणीव असल्यामुळे बदलीदरम्यान याचीही चाचपणी होईल. बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी आणि चांगल्या वनअधिकाऱ्यांना न्याय मिळावा, हे वन मंत्रालयाच्या नव्या आदेशाचे धोरण आहे. या आदेशाची येत्या एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरविले आहे.

Web Title: Now PCCF transfers RFs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.