आधुनिक शेतीला आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

By Admin | Updated: June 4, 2017 00:09 IST2017-06-04T00:09:25+5:302017-06-04T00:09:25+5:30

खरीप हंगामात पेरणी कशी करावी, मान्सूनपूर्व कपाशीची लागवड किती दिवसांपूर्वी करणे गरजेचे आहे़, सोयाबीन लागवड चार फुटांवर टोकन पद्धतीने किती शक्य आहे़?

Now the basis of 'WhatSAP' in modern farming | आधुनिक शेतीला आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

आधुनिक शेतीला आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

आठ हजार शेतकऱ्यांना लाभ : प्रगत शेती व्यवसायासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : खरीप हंगामात पेरणी कशी करावी, मान्सूनपूर्व कपाशीची लागवड किती दिवसांपूर्वी करणे गरजेचे आहे़, सोयाबीन लागवड चार फुटांवर टोकन पद्धतीने किती शक्य आहे़? अशा एकापेक्षा एक माहितीचा खजाना आज व्हॉट्सअ‍ॅपवरून शेतकऱ्यांना मिळत आहे. तालुक्यातील तब्बल ८ हजार युवा शेतकरी या निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे़
शेतीचे उत्पन्न व शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी दरवर्षी कृषीविषयक नियोजनात वेगवेगळे बदल करण्यात येते़ तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांच्या संकल्पनेतून ८४ गावांतील शेतकऱ्यांना कृषी सहायकांच्या माध्यमातून ग्रुप तयार करून विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतल्या जात आहे़

शेतकरी झाले "अपडेट"
दररोज विविध पिकाबाबत सल्ला व्हॉट्सअप च्या माध्यमातून मिळत आहे़ जमिनीची पत, शेणखतांचा वापर, रोग कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जात आहे़ जिरायत जमिनीत ज्चारी, कापूस हे दोन्ही पीक मिश्र पद्धतीने कसे घेता येते? बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करतेवेळी कोणत्या तारखेला व किती दिवसांत करावी, याविषयीचे वेळापत्रक या व्हॉट्स अ‍ॅप शेअर करण्यात येत आहे़

कृषी विभागाच्या योजना, अधिकाऱ्यांची माहिती, प्रगतिशील शेतकऱ्यांची मते व त्यांचे अनुभवाची माहिती युवा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून कृषी सहायकांनी प्रत्येक विभागाचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत.
- अजय तळेगावकर, कृषी अधिकारी

Web Title: Now the basis of 'WhatSAP' in modern farming