शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आता जलयुक्तमध्ये खासगी संस्थांचा सहभाग, विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 18:00 IST

- गजानन मोहोड अमरावती - राज्यात २०१९ पर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आता शासनासह खासगी संस्था व लोकसहभागाच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणाची कामे होणार आहेत. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात खासगी संस्थांच्या प्रकल्पास शासनाने तत्त्वत: मान्यता दिलीे आहे.याच माध्यमातून सध्या ...

- गजानन मोहोड अमरावती - राज्यात २०१९ पर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आता शासनासह खासगी संस्था व लोकसहभागाच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणाची कामे होणार आहेत. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात खासगी संस्थांच्या प्रकल्पास शासनाने तत्त्वत: मान्यता दिलीे आहे.याच माध्यमातून सध्या वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीच्या खोºयात टाटा ट्रस्टचा २० टक्के, कमलनयन जमनालाल बजाज ट्रस्टचा २० टक्के, लोकसहभाग ५ टक्के व शासनाच्या ५५ टक्के सहभागातून कामे होत आहेत. आता अमरावती, अकोला, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातही पीपीपी तत्त्वावर टाटा ट्रस्ट व अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून कामे होणार आहेत. यासाठी राज्य शासनाचा या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांसाठी राज्य शासनाचा ४२ कोटी ६२ लाख रुपयांचा सामंजस्य करार झाला. यामध्ये २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये कामे होणार आहेत. त्याचे सर्वेक्षण आता सुरू होणार आहे, तर योजनांचा डीपीआर मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नदी पुनरुज्जीवनाची कामे होणार आहेत. याशिवाय नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, खोल सलग समतल चर खोदणे, शेततळी व डोह यांच्यामधील गाळ काढणे या कामांसाठी शासनाने सूचना दिल्या आहेत. यासाठी  जिल्ह्यातील प्रस्ताव संबंधित खासगी संस्था तयार करणार आहे. त्याला जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची मान्यता राहणार आहे. कामावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकाºयाची नियुक्ती करणार आहे.

 माथा ते पायथा संकल्पना राबविणारअभियानात मृदा व जलसंधारणाची कामे करताना माथा ते पायथा संकल्पना राबवून कामे होणार आहे. यामध्ये क्षेत्र उपचारांतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांध, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, मजगी, अनघड दगडी बांध व शेततळ्यांचा समावेश राहणार आहे. नाला उपचारामध्ये माती नाला बांध, अर्दन स्ट्रक्चर, गॅब्रियन बंधारा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारा बांधण्यासह गाळ काढण्यात येणार आहे.

 जलयुक्तच्या गावांव्यतिरिक्त होणार कामेजलयुक्त शिवारव्यतिरिक्तही अन्य गावांंमध्ये अशाच स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. शासकीय यंत्रणेसोबत आता अशासकीय संस्था, खासगी संस्था, धर्मादाय संस्था, व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व निधी व लोकसहभागातून ही कामे करण्यात येणार आहेत. या सर्वांचा ४५ टक्क्यांचा निधी व शासनाच्या ५५ टक्क्यांमधून ही कामे करण्यास राज्य शासनाने मागील आठवड्यात मंजुरात दिली.

टॅग्स :Waterपाणी