आता जनावरांसाठी आधार कार्ड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:37 PM2020-11-04T12:37:38+5:302020-11-04T12:38:29+5:30

Amravati News animals जनावरांसाठी पशू आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून जनावरांची गणना केली जाणार आहे.  पशुपालकांना हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. 

Now Aadhar card for animals | आता जनावरांसाठी आधार कार्ड 

आता जनावरांसाठी आधार कार्ड 

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती:   जनावरांसाठी पशू आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम तालुक्यात राबविला जात आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून जनावरांची गणना केली जाणार आहे.  पशुपालकांना हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. 
राजुरा बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्यावतीने जनावरांना आधार बिल्ला देण्याचा कार्यक्रम नुकताच वाडेगाव येथे पार पडला. लसीकरण, वैद्यकीय साहाय्यासाठी या आधार कार्डचा फायदा होणार आहे. त्याशिवाय पशू खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. वन्यप्राण्यांचा हल्ला, विद्युत स्पर्शाने मृत्यू  झाल्यास विमा मिळणार नाही, असे राजुरा बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मधुकर जाधव यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Now Aadhar card for animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.