शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आता वृक्षतोडीसाठी लागणार ३० प्रकारची कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:21 IST

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

अमरावती : राज्य ३३ टक्के वृक्ष आच्छादनाखाली आणण्यासाठी शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली तरी अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत. त्याशिवाय वृक्षतोडीची परवानगी मिळणार नाही, शिवाय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे आदेश शासनाने निर्गमित केले. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या मालकी प्रकरणातील वृक्षतोड करावयाची असल्यास नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. अवैध वृक्षतोडीचे प्रकरण निदर्शनास आल्यास त्या भागातील संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, ही बाब वनसचिव खारगे यांनी स्पष्ट केली आहे. एकीकडे १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालविली असताना, अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. मालकी जागेवरील वृक्षतोड परवानगीबाबत अर्ज आल्यास वनपाल, वनक्षेत्रपालांना घटनास्थळी जाऊन वृक्षाचे मूल्यांकन करावे लागणार आहे. वृक्षतोडीसाठी आलेल्या अर्जात त्याची कारणे, वृक्षांच्या प्रजाती, गाव नमुना, ७/१२, तहसलीदाराकडून स्वामित्वाचा दाखला, तलाठ्याचा चतु:सीमा दाखला, खाते उतारा, प्रतिज्ञापत्र, भोगवटदार-२ असल्यास झाडांचा मालकी दाखला, रहिवासी दाखला, आदिवासी नसल्याबाबत दाखला, सर्वे क्रमांक व गाव नमुना ६, झाडोरा असल्यास साक्षांकित हद्दीचा दाखला, मंडळ निरीक्षकांचे नाहरकत प्रमाणपत्र, उभ्या झाडांची प्रजातीवार यादी, धारणक्षेत्र १२ हेक्टर असल्याचे तहसीलदारांची एनओसी, पुन:स्थापित असल्यास उपजिल्हाधिकाºयांचे पत्र, अर्जदार एसटी असल्यास महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटारांच्या झाडांची विक्री करणे अधिनियम १९६९ अंतर्गत विहित अर्ज अनिवार्य, नैसर्गिक उगवणीतून वृक्ष निर्माण झाली असल्यास राजस्व शुल्क भरल्याची पावती, सदर झाडे ही बारमाही पाण्याच्या स्रोतापासून १०० फूट अंतरावर नाहीत असा वनपालांकडून दाखला, वनसर्वेक्षकांचा दाखला, भूमिअभिलेख निरीक्षक किंवा  उपअधीक्षकांचा दाखला, फळझाडांच्या तोडीस फलोत्पादन अधिकाºयांचा दाखला, भोगवटदार-२ असल्यास सदर क्षेत्राचे मूळ वाटप आदेश अशा ३० प्रकारांची कागदपत्रे वृक्षतोडीसाठी अनिवार्य करण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालनवृक्षतोडीची परवानगी देताना वनाधिकाºयांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. याचिका क्रमांक २०२/९५ : १७१/९६ (पी.एम. गोदावरम विरुद्ध भारत सरकार निकाल दि. १२/१२/१९९६, एआयआर १९९७ एससी १२२८-१२३४) मधील परिच्छेद क्रमांक ३ दिलेल्या ‘वन’ या व्याख्येत सदर झाडांचे क्षेत्र मोडत नाही, असा तालुका भूमिअभिलेख निरीक्षक, उपअधीक्षकांचा दाखला आवश्यक असणार आहे.

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी यापूर्वी अनेकदा सूचना वजा आदेश निगर्मित केलेले आहे. मात्र, आता वृक्षतोड परवानगीची नियमावली कठोर केली आहे. वनाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली असून, अवैध वृक्षतोड झाल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.- विकास खारगे, प्रधान वनसचिव, महाराष्ट्र 

टॅग्स :environmentवातावरण