आजाराचे मूळ शोधण्याऐवजी ग्रामस्थाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:09+5:302021-05-30T04:11:09+5:30
वरूड : तालुक्यातील ..................... गावासाठी नेमलेले ग्रामसेवक पंचक्रोशीत चर्चित झाले आहेतग. ग्रामस्थांमधील किडनीच्या आजाराचे मूळ शोधण्याऐवजी ग्रामसेवकाने वृत्तपत्राला त्याची ...

आजाराचे मूळ शोधण्याऐवजी ग्रामस्थाला नोटीस
वरूड : तालुक्यातील ..................... गावासाठी नेमलेले ग्रामसेवक पंचक्रोशीत चर्चित झाले आहेतग. ग्रामस्थांमधील किडनीच्या आजाराचे मूळ शोधण्याऐवजी ग्रामसेवकाने वृत्तपत्राला त्याची माहिती देणाऱ्या ग्रामस्थाला टपालाने दुसऱ्यांदा नोटीस पाठविली आहे.
ग्रामसेवक आठवड्यातून एकदाच ग्रामपंचायत कार्यालयात येतात. मात्र, गावाला भेट देत नाहीत. त्यांच्याऐवजी ग्रामपंचायत कार्यालयातून चपराशी या पदावरील व्यक्ती कागदी घोडे नाचवतो, असा आरोप ग्रामस्थांनी सदर प्रतिनिधीकडे पुन्हा केला.
तज्ज्ञांकडून गावात बळावत असलेल्या किडनीच्या आजाराची चौकशी करणे दूर, या गावामध्ये बहुसंख्य गोंड, कोरकू आदिवासी, धनगर ग्रामस्थांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन ग्रामसेवकाचा नोटीस वर जास्त भर दिसत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून उमटत आहे.-----------------
बोअरवेलच्या खड्ड्यात सांडपाणी
सदर प्रतिनिधीला ग्रामस्थांनी गावातील खोलवट भागात असलेल्या बोअरवेल दाखविली. त्या बोअरवेलजवळ असलेल्या खड्ड्यात बाराही महिने गावातील सांडपाणी साचलेले असते. पावसाळ्यात तर त्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप असते. हा प्रकार कित्येक वर्षांपासून ग्रामसेवकाच्या निदर्शनास का आला नाही, हे एक गूढच आहे. आजाराचे मूळ या खड्ड्यात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मुद्दा नेऊ, असे ते म्हणाले.