लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ५१४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बुधवारी बजावण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत. प्रशिक्षणाच्या व्यवस्थेसाठी अमरावती महापालिकेचे एकूण पथक ९०० आणि एकूण ३६०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रशिक्षण सत्रांना अनुपस्थिती वा प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्यात गैरहजर राहणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, उत्तर समाधानकारक न मिळाल्यास शिस्तभंग, विभागीय चौकशी तसेच नियमानुसार दंडात्मक कारवाई होईल. प्रशासनाकडून पुढील काळात उपस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
"निवडणूक कर्तव्य हे कायदेशीर व अनिवार्य असून त्यात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. ज्यांनी कर्तव्याप्रती दांडी मारली त्यांच्यावर अन्यथा कठोर प्रस्तावित केली जाणार आहे."- सौम्या शर्मा चांडक, आयुक्त महापालिका
Web Summary : Amravati Municipal Corporation issued show-cause notices to 514 officials and employees for unauthorized absence from election duty. Strict action is promised for dereliction of duty to ensure transparent elections. Commissioner Saumya Sharma Chandak warned of disciplinary action for unsatisfactory responses, emphasizing the legal obligation of election duties.
Web Summary : अमरावती नगर निगम ने चुनाव ड्यूटी से अनाधिकृत रूप से अनुपस्थित 514 अधिकारियों और कर्मचारियों को कारण बताओ नोटिस जारी किया। पारदर्शी चुनाव सुनिश्चित करने के लिए कर्तव्य में लापरवाही पर सख्त कार्रवाई का वादा किया गया है। आयुक्त सौम्या शर्मा चांडक ने असंतोषजनक जवाबों पर अनुशासनात्मक कार्रवाई की चेतावनी दी, चुनाव कर्तव्यों की कानूनी बाध्यता पर जोर दिया।