फिक्स पॉइंटवर कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना नोटीस (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:07+5:302020-12-11T04:38:07+5:30

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शहरात आकस्मिक भेट देऊन मुख्य चौकातील फिक्स पॉइंटची पाहणी केली. तेथे कर्तव्यात ...

Notice to three cops for fixing duty | फिक्स पॉइंटवर कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना नोटीस (सुधारित)

फिक्स पॉइंटवर कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना नोटीस (सुधारित)

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शहरात आकस्मिक भेट देऊन मुख्य चौकातील फिक्स पॉइंटची पाहणी केली. तेथे कर्तव्यात कुचराई करणाऱ्या तीन पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस धास्तावले आहे.यावेळी त्यांनी इर्विन चौकातील वाहतूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. या दरम्यान मालवीय चौक येथे वाहन थांबवून खरेदी - विक्री होणाऱ्या ऑटोडिलच्या वाहनांचे रेकॉर्ड त्यांनी तपासले. चोरीचे वाहन तर विकत घेतले नाही ना? या संदर्भात खातरजमा केली.

मालवीय चौकात ऑटोडिलच्या वाहनांचा मोठा व्यवसाय आहे. पोलीस आयुक्तांनी वाहन थांबवून सिटी कोतवाली ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांना ऑटोडिलचे रेकॉर्ड तपासणीचे निर्देश त्यानी दिले. मात्र, ऑटोडिलच व्यवसाय नियमानुसार सुरू असल्याचे पडताळणीत लक्षात आले.

तत्पूर्वी पोलीस आयुक्तांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, या भेटी देऊन शहरातील विस्कळीत वाहतुक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील नियमबाह्य वाहतुकीला आळा घालण्याकरिता सक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी वाहतुक शाखेच्या कार्यालयाला अकास्मिक भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, विना क्रमांकाची वाहने, फॅन्सी वाहने, संशयित आढळून येणारी वाहने ताब्यात घेऊन कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. सीपींनी शहरात अकास्मिक दौरा केल्याने शहर पोलीस अलर्ट झाली होती.

कोट

शहरात आकस्मिक पाहणी केली असता, फिक्स पॉइंटवर उपस्थित न राहता कामात कुचराई केल्याबाबत तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. शहर पोलिसांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

- आरती सिंह,

पोलीस आयुक्त, अमरावती

Web Title: Notice to three cops for fixing duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.