शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित धार्मिक स्थळांना बजाविल्या नोटीस

By admin | Updated: September 23, 2015 00:10 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याबाबत नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहरात २०८ स्थळे : २००९ नंतरच्या देवस्थानांची शोधमोहीमअमरावती : वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याबाबत नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २००९ नंतरची धार्मिक स्थळे जमिनदोस्त करण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून शहरात २०८ अतिक्रमित धार्मिक स्थळे असल्याचे सर्वक्षणाअंती स्पष्ट झाले आहे.अमरावती शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाला असून या शहराची वाहतूक व्यवस्था, मूूलभूत सोयीसुविधा, पाणीपुरवठा आदी सोयी नागरिकांना नियोजनबद्ध पध्दतीने पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आडकाठी ठरणाऱ्या अतिक्रमीत धार्मिक स्थळांना हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यानुसार पाचही झोननिहाय अतिक्रमित धार्मिक स्थळांना नोटीस बजावून ते हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील अतिक्रमित धार्मिक स्थळे न हटविल्याबद्दल शासनावर ताशेरे ओढले आहेत. विनापरवानगी तयार झालेली धार्मिक स्थळे हटवून तसा अहवाल उच्च न्यायालयाला पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांच्या मुद्यांवरून ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून त्यांच्या हद्दीतील अतिक्रमित धार्मिक स्थळे जमीनदोस्त करुन तसा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या धार्मिक स्थळांबाबत एका समितीचे गठन करण्यात आले आहे. यात अध्यक्षपदी महापालिका आयुक्त तर सदस्यपदी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सदस्यांचा समावेश आहे. आयुक्त गुडेवार यांनी पाचही झोनच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेत या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याबाबत ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. अतिक्रमित धार्मिक स्थळांची पाहणी करण्याची जबाबदारी अभियंत्यांवर सोपविली आहे. (प्रतिनिधी)सहायक आयुक्तांवर सोपविली जबाबदारीशहरातील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याची जबाबदारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाचही झोनच्या सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. २०८ अतिक्रमित धार्मिक स्थळे हटवून हा अहवाल समितीपुढे सादर करावयाचा आहे. २००९ नंतरची धार्मिक स्थळे हटविण्यात न आल्यास महापालिकेला जबाबदार धरले जाणार आहे.