माझ्या मुलीची आत्महत्या नसून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:50+5:30
निवेदनानुसार, वरूड तालुक्यातील जामगाव (खडका) येथील अरुण काळे यांची मुलगी पूनम हिचा विवाह सन २००८ मध्ये संजय बाबाराव ठाकरे याच्याशी झाला होता. तिला अपत्यप्राप्ती नसल्यामुळे संजय ठाकरे, सासू उषा ठाकरे, दीर विनोद ठाकरे, प्रमोद ठाकरे, रेखा ठाकरे, दामिणी विनोद ठाकरे व गौरव विनोद ठाकरे हे तिला सतत त्रास देत होते व भांडण उकरून काढत असल्याचे ती आमच्याकडे नेहमीच सांगत होती.

माझ्या मुलीची आत्महत्या नसून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौंडण्यपूर येथील विवाहितेला अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरकडच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. १२ ऑक्टोबरला विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप वडील अरुण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. परंतु, कुऱ्हा पोलिसांनी अद्याप कार्यवाही केली नाही. माझ्या मुलीची आत्महत्या नसून, खून झालेला असल्याने आरोपींविरुद्ध त्यासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनानुसार, वरूड तालुक्यातील जामगाव (खडका) येथील अरुण काळे यांची मुलगी पूनम हिचा विवाह सन २००८ मध्ये संजय बाबाराव ठाकरे याच्याशी झाला होता. तिला अपत्यप्राप्ती नसल्यामुळे संजय ठाकरे, सासू उषा ठाकरे, दीर विनोद ठाकरे, प्रमोद ठाकरे, रेखा ठाकरे, दामिणी विनोद ठाकरे व गौरव विनोद ठाकरे हे तिला सतत त्रास देत होते व भांडण उकरून काढत असल्याचे ती आमच्याकडे नेहमीच सांगत होती. परंतु, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता पूनमने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे संजय ठाकरेने फोनद्वारे कळविले. रात्री १२ वाजता लहान जावई, मुलगी, पत्नी व मुलगा यांच्यासह अरुण काळे हे रात्री १२ वाजता अमरावती येथे इर्विन रुग्णालयात पोहोचले. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
अंत्यविधी आटोपल्यानंतर १३ ऑक्टोबरच्या रात्री पहाटे ४ वाजता कुऱ्हा पोलीस ठाण्यात अरुण काळे यांनी तक्रार दिली. तेव्हापासून या प्रकरणात काहीही कार्यवाही झालेली नाही. सासरच्या मंडळीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी अरूण काळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.