शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कालव्याचे नव्हे, हे तर पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:53 IST

ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कांगावा : दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. प्रशासनाला मुठेच्या घटनेची पुनरावृत्तीची प्रतीक्षा आहे काय, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.तिवसा तालुक्यात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. तालुक्यातील भिवापूर, जळका व अमदोरी हे लघुप्रकल्प आताच पूर्णत: कोरडे पडले असताना, उजवा मुख्य कालव्याच्या किमी ४० मध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी लिटर पाणी साचले. हे पावसाचे पाणी असल्याचा जावईशोध जलसंपदा विभागाने लावला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ ४१ टक्केच साठा असल्याने अमरावतीला एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. रबीला पाणी मिळणार नाही, तर कपाशी व तूर पिकांसाठी केवळ पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक पाळी सोडण्यात आली. आता तीन आठवड्यानंतर एक पाळी सोडण्यात येईल. त्यामुळे रबीचा गहू व हरभºयाला सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे.प्रकल्पाच्या उर्वरित पाण्याचे औद्योगिक व शहराच्या वापरासाठी आरक्षण झाले आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा थेंब न थेब महत्त्वाचा असताना, पाळी सोडल्यानंतर जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल, तर या विभागावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे. कालवा क्षतिग्रस्त झाल्यास पिकांसह लगतच्या वस्त्यांनाही धोका आहे. अशा स्थितीत कालव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ विषयाला बगल देण्याचा व वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे.वास्तविक, या ठिकाणी गतवर्षीपासून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाझर व सरळ विमोचकाच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एप्रिलपर्यंत हीच स्थिती कायम होती, याविषयीचा अहवाल कार्यकारी अभियंता कार्यालयास सादर झालेला असताना थातूरमातूर दुरुस्तीवर बोळवण करण्यात आली. परिणामी यंदा कालव्यातून पाणी जायच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात उपअभियंत्याशी संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल दोन दिवसांपासून ‘स्वीच आॅफ’ आहेत.मायनर बुजले झुडपांनीकालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या भेगांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली असल्याने आधीच थातूरमातूर झालेले अस्तरीकरण उखडले आहे. परिणामी कालव्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मायनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने पाणी ओसंडून मनमानी वाहते. त्यात झाडे उगविली असल्याने पाणी प्रवाह अडतो. कित्येक वर्षापासून दुरूस्तीच नसल्यामुळे या सर्व कामांचे व यावर खर्च झालेल्या निधीचे सोशल आॅडिट व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कालव्यातून पाण्याचा अपव्यय झालेला नाही. कालवे निर्माण होत असताना कंत्राटदारांनी खड्डे केलेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला आहे.- रवींद्र लांडेकरमुख्य अभियंता, जलसंपदा