शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:01 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघ, तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे राज्यभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गतवर्षी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याही समस्येवर राज्य सरकारने तोडगा काढला नाही. केवळ संघटनांचा वेळ मारून नेण्याची भूमिकाच ठेवल्यामुळे विद्यापीठ, तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला असून, संपावर तोडगा न निघाल्यास पुढे कामकाज ठप्प पडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघ, तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे राज्यभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गतवर्षी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याही समस्येवर राज्य सरकारने तोडगा काढला नाही. केवळ संघटनांचा वेळ मारून नेण्याची भूमिकाच ठेवल्यामुळे विद्यापीठ, तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरू केले. विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येऊन आपल्या संघटनशक्तीचे प्रदर्शन घडवीत मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, विद्यापीठ अधिकारी फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडेसह कर्मचारी संघाचे महासचिव विलास सातपुते, संजय ढाकूलकर, शाम चहाकार, सहसचिव संजय बाळापुरे, नरेंद्र खैरे, कोषाध्यक्ष विजय तुपट, सदस्य प्रेम मंडपे, प्रफुल्ल ठाकरे, संतोष मालधुरे, सतीश लोखंडे, रामभाऊ बुगल, शशीभूषण हुसे, मनीष शास्त्री, नीलेश वंदे, मुरलीधर चिलुरकार आदी कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या मागण्याशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्यांची थकबाकी अदा करावी, अकृषी विद्यापीठातील ७९६ पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आयोगाच्या शिफारसीनुसार १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनरुज्जीवित करण्यात यावा. 

 

टॅग्स :universityविद्यापीठStrikeसंप