आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:04+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांची अवस्था आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरून प्रकट होते.

आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीही मिळेना
किशोर मोकलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पूर्णा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बोअरवेल दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्ण, आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी दुरापास्त झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांची अवस्था आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरून प्रकट होते. जवळपास २५ गावांतील आरोग्याची जबाबदारी असणाºया या केंद्रात रोज शेकडो रुग्ण येतात. किरकोळ आजारी रुग्णांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले जाते, असा आरोप आरोग्य समिती सदस्य रूचा वाटाणे यांनी केला. आहे.
नादुरुस्त बोअरवेलबाबत संबंधित अधिकाºयांना कळविले आहे. बोअरवेलचे काम त्वरित करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
- डॉ. समीना खान
वैद्यकीय अधिकारी
आपण यासंदर्भात डीएचओ रणदळे यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांत बोअरवेलचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- श्याम मसराम,
जि.प. सदस्य