परदेशात वाहन परवान्याचे नूतनीकरण अद्याप नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST2021-08-27T04:18:04+5:302021-08-27T04:18:04+5:30

अमरावती/ संदीप मानकर आरटीओत आंतरराष्ट्रीय वाहन परवाना वर्षभराकरीता काढता येतो. मात्र, अद्याप तरी या परवान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाची कुठलीही ...

No vehicle license renewal abroad yet? | परदेशात वाहन परवान्याचे नूतनीकरण अद्याप नाही?

परदेशात वाहन परवान्याचे नूतनीकरण अद्याप नाही?

अमरावती/ संदीप मानकर

आरटीओत आंतरराष्ट्रीय वाहन परवाना वर्षभराकरीता काढता येतो. मात्र, अद्याप तरी या परवान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाची कुठलीही गाईडलाइन आरटीओला प्राप्त झाली नाही. त्यामुळे अद्याप तरी आंतरराष्ट्रीय परवान्याचे नूतनीकरण करता येणार नसल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी शासनाच्या ‘सारथी’ या साईटवर जावून ऑनलाईन पद्धतीने फार्म भरुन कागतपत्राची पुर्तता करावी लागते. तसेच सदर परवाना काढण्याकरिता एक हजाराचे शुल्क भरावे लागत असल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाकाळात संख्या घटली

आंतरराष्ट्रीय वाहन परवाने

२०१८-६९

२०१९- ८५

२०२०-३२

२०२१- ५

असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

१) इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमीट(आयडीपी) म्हणजे आंतरराष्ट्रीय

चालक परवाना काढण्यासाठी ‘सारथी’ या पोर्टलवर जावून ऑनलाइन परवाना काढावा लागतो. २) त्याकरिता ज्याला परदेशात जायचे आहे, त्याचा पासपोर्ट व व्हॅलिड व्हिसा असणे आवश्यक आहे.

३) ऑनलाईन एक हजार रुपये शुल्क भरुन आयडीपी परवाना काढता येतो. मात्र व्हीसा, पासपोर्टची झेरोक्स प्रत ऑफलाईन पद्धतीने आरटीओकडे सादर करून परवाना प्रमाणीत करून कागतपत्रांची तपासणी केली जाते.

कोण काढतो वाहन परवाना ?

१) ज्याला विदेशात जायचे आहे, त्या ठिकाणी वाहन चालवायचे आहे. तो व्यक्ती हा परवाना काढतो. २) हा परवाना घेण्याकरीता ऑनलाइन पद्धतीने फार्म भरुन परवाना कुणालाही सहज मिळतो. मात्र ज्या देशात जात आहे. त्याचा व्हिसा व पासपोर्ट लागतो. हा परवाना एक वषाकरिता व्हॅलिड असतो. मात्र, राज्य शासनाची अशी कुठलीही गाईडलाइन नाही की परवाना नूतनीकरण केला जातो. मात्र, भविष्यात अशी गाईडलाईन आली तर नूतनीकरणाची अंमलबजावणी केली जाईल.

कोट

व्हॅलिड व्हीसा, पासपोर्ट व ऑनलाइन प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर विदेशात जावून त्या ठिकाणी वाहन चालवायचे असेल तर आडीप परवाना मिळतो. मात्र सध्या या परवान्याच्या नुतनीकरण संदर्भात परिवहन विभागाच्या कुठल्याही गाईडलाइन प्राप्त नाहीत. त्यामुळे परवाना काढल्यानंतर त्याची मुदत एक वर्षाची असते.

- सिद्धार्थ ठोके, एआरटीओ अमरावती

Web Title: No vehicle license renewal abroad yet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.