शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीकाठाने प्रवास, 70 वर्षात एसटी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 15:00 IST

सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे.

मोहन राऊत / धामनगाव रेल्वे

अमरावती - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण ते घेन्यासाठी आजही धडपड करावी लागते नदीच्या काठाने तब्बल साडेचार किलोमीटरचा दररोज प्रवास आहे.  सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याच्या टोकाला तिवसा तालुक्यातील पुनर्वसन असलेल्या आलवाडा, धारवाडा, दुर्गवाडा येथील तीन गावांची अवस्था गंभीर आहे येथील विद्यार्थ्यांना धामनगाव तालुक्यातील अंजनसीगी हे गाव शिक्षणासाठी जवळ असल्याने येथे तब्बल 40 विद्यार्थी दररोज येतात मागील 70 वर्षात या तिन्ही गावाने एस. टी. ची चाके पाहिली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

संकटाचं व्यूहचक्र इयत्ता आठवी, नववी, दहावी शिक्षण घेणाऱ्या  सावित्रीच्या लेकींना दररोज सायकल ने तर कधी पायदळ पायपीट करावे लागते अकरा वाजता शाळेत पोहोचण्याकरिता सकाळी 9 वाजता घरून निघावं लागत शाळेमधून यायला रात्र होते. वर्धा नदीचा काठ व  निर्मनुष्य असलेल्या या रस्त्याने साप, विंचू असे दररोज संकटाचे चक्रव्यूह असल्याची कैफियत चिमुकले मांडतात 

शिक्षकांची तळमळ मागील वर्षी काही दिवस चादूर रेल्वे आगारांची एसटी येत होती. ती बस सुरू व्हावी म्हणून अंजनसिंगी येथील साईबाबा विद्यालयाचे मुख्याद्यापक सुभाष पुसदकर व  शिक्षक रवींद्र सोळंके यांची तळमळ पाहायला मिळते. परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिली त्यांच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू आहे मात्र लालफीत शाहीवर कोणताच फरक पडत नसल्याचे दिसते

लोकप्रतिनिधीना जुमानत नाही अधिकारी 

आपल्या  मतदारसंघातील धरणग्रस्त गावात एसटी सुरू व्हावी म्हणून तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्वरीत परिवहन महामंडळाला पत्रव्यवहार केला फोनवरून संवाद साधला  येथील ग्रामस्थ अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या कडे  बस विषयी समस्या घेऊन गेले त्यांना   निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावर तात्काळ दखल घेत गोंडाणे यांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुखांना लेखी पत्र दिले व बस चालू करण्या संदर्भात फोनवरून संवाद साधला.परंतू आजही एसटी सुरू झाली नाही .