२० डिसेंबरपासून रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:32+5:30
दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु, १० दिवसांपूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये लांब पल्ल्याचे आरक्षण मिळत नसल्याची वास्तव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर ये-जा करताना कसा प्रवास करावा, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे.

२० डिसेंबरपासून रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून ‘नो रूम’ झळकत आहे. अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्याचे नियोजन आखले असले तरी दलालांनी आतापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळविल्याची माहिती आहे.
दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु, १० दिवसांपूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये लांब पल्ल्याचे आरक्षण मिळत नसल्याची वास्तव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर ये-जा करताना कसा प्रवास करावा, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर २० डिसेंबरपासून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नै, अहमदाबाद मार्गे ये- जा करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याने अनेकांना चिंतेत आहे, तर रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तात्काळचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. परिणामी प्रवाशांना दलालांच्या आश्रयाला जावे लागणार असे आतापासून चित्र निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चैन्नई, हावडा, अहमदाबाद आदी प्रमुख मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचे फलक झळकत आहे.
मुंबई, पुणे मार्गे रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल
मध्य रेल्वे विभागातून मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल असल्याची माहिती आहे. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-काजीकुडा एक्स्प्रेस, पुणे-हावडा हमसफर एक्स्प्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गितांजली, मुंबई-हावडा मेल, कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस अशा सर्वच गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे.
ख्रिसमस, नववर्षात दरवर्षी रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी असते. यंदासुद्धा तीच स्थिती आहे. २० डिसेंबरपासून जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ झळकत आहे. पुणे, मुंबई ये- जा करणाºया प्रवाशांची आरक्षणाला पसंती आहे.
- शरद सयाम
मुख्य खंड वाणिज्य निरिक्षक,