शहरं
Join us  
Trending Stories
1
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
2
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
9
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
12
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
13
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
18
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
19
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
20
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना?' विचारत अधिकारी म्हणाले 'महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशचे रस्ते गुळगुळीत !'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:36 IST

Amravati : मेळघाटातील काटकुंभआरोग्य केंद्राची घेतली झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मध्य प्रदेशातील रस्ते महाराष्ट्राच्या तुलनेत गुळगुळीत आहेत, अशी कबुली आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली. हे बोलत असताना, कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना, अशी विचारणा करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मध्य प्रदेशातील अनेक रुग्ण उपचारकरिता काटकुंभ येथील आरोग्य केंद्रात येतात.

काटकुंभ चुर्णी परिसरात जाण्यासाठी मध्य प्रदेशचा काही भाग ओलांडून जावे लागते सचिवांचा ताफासुद्धा याच भागातून गेला, तेव्हा तिथले रस्ते चांगले असल्याच्या प्रत्यय त्यांना आला. 

तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राला वाघमारे यांनी शुक्रवारी भेट दिली, दरम्यान, त्यांनी औषधी पुरवठा, केंद्रातील सोयी-सुविधा, रुग्णसेवेतील प्रमुख अडचणी यासह बाल व माता मृत्यूचे नेमके कारण काय, याविषयावर डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मार्गदर्शन केले. स्थानिक पदाधिकारी तथा नागरिकांशी संवाद साधत प्रशासन नेमके कुठे कमी पडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद बांधकाम विभागासह विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणीदेखील केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, एडीएचओ परिसे, तहसीलदार जीवन मोराणकर, गटविकास अधिकारी विजय खेडकर, सीडीपीओ वानखडे, काटकुंभच्या सरपंच ललिता बेठेकर, पीयूष मालविया, कमलेश राठौर, सोनू मालवीय, शिवा जैसवालसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

केव्हा संपणार काळ्या पाण्याची शिक्षा ?

  • काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत परिचारिकांनी आम्हाला कायम सेवेत समावून घ्या, अन्यथा मेळघाट बाहेर बदली करा, अशी मागणी केली.
  • इतक्या वर्षापासून आम्ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोय, ती केव्हा संपणार? असा प्रश्न उपस्थित करत सचिवांच्या पुढ्यात आपली कैफियत मांडली. याशिवाय परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
English
हिंदी सारांश
Web Title : Official Admits MP Roads Smoother, Jokes About Being Filmed

Web Summary : Secretary Vijay Waghmare admitted Madhya Pradesh roads are better. He jokingly asked if anyone was filming, causing laughter. He visited Katkumb health center, reviewed facilities, discussed challenges, and addressed public grievances and staff concerns regarding permanent positions.
टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशnagpurनागपूरVidarbhaविदर्भ