No masks, tie shirts! | मास्क नाही, शर्ट बांध!

मास्क नाही, शर्ट बांध!

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई । पथ्रोटमध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चेहऱ्याला मास्क बांधणे अनिवार्य केले आले आहे. मात्र, अनेकांनी मास्कला फाटा दिल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई आरंभली आहे. अशाच शनिवारी पथ्रोट पोलिसांनी मास्क नसणाºया तरुणाला चक्क शर्ट काढून मास्क म्हणून बांधण्यास बजावले.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार सायंकाळपासून जनता कर्फ्यू घोषित केला. त्यात अकारण फिरण्यास बंदी आहे. त्या अनुषंगाने पथ्रोट पोलिसांनी शनिवार सकाळपासून बसस्टॅन्ड व गावाच्या मुख्य चौकात नाकाबंदी करून अकारण बाहेर पडणाºयांवर कारवाई केली. दरम्यान सायकलस्वार तरुण पोलिसांच्या दृष्टीस पडला. त्याच्या चेहºयाला मास्क नव्हता. जमादार खानंदे व पोलीस शिपाई योगेश गिरी यांनी त्याला थांबवून मास्कबाबत विचारणा केली. मास्क नसल्याने त्यांनी त्याला शर्टने चेहरा बांधण्यास सांगितले. त्यानेही कारवाईच्या भीतीने अंगावरील शर्ट काढत चेहºयाला बांधले. तेथून काढता पाय काढला. याशिवाय मास्क नसणाºया व अकारण बाहेर पडणाºयांकडून दंड वसूल करण्यात आला.

Web Title: No masks, tie shirts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.