शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:12 IST

दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावात होळी पेटविली जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअनंत बोबडेअमरावती : दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. पंचक्रोशीत महाराजांचे अनेक चमत्कार लोकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला त्यांनी देह ठेवला. त्यामुळे या गावात होळी पेटविली जात नाही. रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही. या घटनेला आज ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत.दर्यापूर तालुका खारपाणपट्टा आहे. मात्र, महाराजांनी त्याकाळी जलस्त्रोत दाखवून गोड पाण्याने गावकऱ्यांची तहान भागविली. आजही पाण्याचा अखंड झरा ओसंडून वाहत आहे. अशा एक नव्हे, अनेक कथा गावकरी सांगतात. लोकसहभागातून महाराजांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या मंदिरात महाराजांसोबत श्री दत्त व भगवान गौतम बुद्धाची तेजोमय मूर्ती विराजमान आहे.श्री दत्त जयंतीला भव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते. होळी पौर्णिमा यात्रा गावात आयटीआयनजीक परशरामनगर येथे व जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमेला श्री संत परशराम महाराज जलकुंड (झरा) येथे साजरे केले जातात. होळीच्या दिवशी दिवसभर मंदिरात मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. अत्यंत विलोभनिय रोषणाईने आयटीआय येथील मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. रंगपंचमीचे दिवशी संत परशराम महाराज यांचे जयघोषात दिंड्या, पताका व वारकरी पावली खेळत ‘श्रीं’च्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा काढतात. महिला सडा, रांगोळ्या काढून व दिवे लावून रस्ता सजवतात. आयटीआयमधील मंदिरात काल्याचे कीर्तन केले जाते. दहीहंडी फोडली जाते व नंतर महाप्रसाद वितरित केला जातो, अशी माहिती आयटीआयचे गटनिदेशक अनिलकुमार गावंडे यांनी दिली. ॉकार्यक्रमाचे आयोजन पिंपळोद आयटीआयचे प्राचार्य राजेश वाघजाळे, निदेशक व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ करतात.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सगळीकडे होळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु पिंपळोद येथे ६९ वर्षांपासून कुणीही होळी खेळले नाही. पिंपळोद येथे परशराम महाराज यांनी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी पेटत नाही. सण साजरा करण्यात येत नाही.- देवकन्या भगत, सरपंच, पिंपळोद 

टॅग्स :Holiहोळी