शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रायबल'च्या नामांकित शाळांमध्ये नव्या शैक्षणिक संस्थांना ‘नो एन्ट्री’ ​​​​​​​

By गणेश वासनिक | Updated: February 9, 2023 16:59 IST

शैक्षणिक संस्थापुढे सरकार नरमले, नवीन शाळांमध्ये प्रवेशाबाबत प्रस्तावासाठीची जाहिरात केली रद्द

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यासंदर्भात शाळा संस्थाचालकांकडून मागविण्यात आलेले प्रस्ताव गुंडाळले जाणार आहे. कारण नवीन शाळांचे प्रस्तावासाठीची जाहिरात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नव्या नामांकित शाळांमध्ये तूर्तास होणार नाही, हे स्पष्ट होते. नामांकित शाळा संचालकांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या ग्रेडेशननुसार ५०, ६० आणि ७० हजार रुपये वार्षिक अनुदान मिळते, हे विशेष.

दऱ्या, खोऱ्यात, डोंगराळ, दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना इंग्रजीचे धडे गिरविता यावे आणि शहरी भागातील ‘नामांकित’ शाळांमध्ये निवासी प्रवेश मिळावा, यासाठी राज्यात सन २०१०-२०११ या वर्षापासून ही योजना सुरू झाली आहे. मात्र, या योजनेचा आदिवासी विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा, यासाठी सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून लक्षांकात वाढ करण्यात आली. त्याअनुषंगाने सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात प्रत्येक प्रकल्प कार्यायलातंर्गत शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही उत्कृष्ट व दर्जेदार नामांकित निवासी शाळांची निवड करणे शासनाच्या विचाराधीन होती. नामांकित शाळा संचालकांकडून पहिली व दुसरीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना निवासी प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फत संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यापूर्वीच प्रस्ताव गुंडाळल्या गेले आहे.

त्यामुळे मंत्रालय स्तरावर नेमके काय चक्र फिरके की, नवीन शाळांमध्ये प्रवेशाबाबताची जाहिरात केली रद्द करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. १४८ नामांकित शाळांमध्ये ४९ हजार विद्यार्थांचे प्रवेश राज्यात नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावती या चारही अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत २७ एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या नियंत्रणातील १४८ इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीचे ४९ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानामुळे काही शैक्षणिक संस्था चालक गब्बर झाले आहेत. शाळांमध्ये कोणत्याहीपायाभूत सुविधा नसताना त्या शाळा कागदाेपत्री ‘नामांकित’ दर्शविण्यात आल्या आहेत. तथापि, आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी ललितकुमार धायगुडे यांनी ६ फेब्रुवारी रोजी पत्र जारी करून नामांकित शाळांच्या प्रवेशासाठी नव्या शैक्षणिक संस्थांना ब्रेक लावला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाSchoolशाळाAmravatiअमरावतीStudentविद्यार्थी