शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

महापालिकेला अधिकारांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:18 PM

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.

ठळक मुद्देदंड करण्याची मोहीम थंड : गुड मार्निंग पथक कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.राज्याचा नागरी भाग ‘हगणदारीमुक्त’ घोषित झाल्यानंतरही शहरात काही ठिकाणी उघड्यावर प्रात:विधी उरकविला जात असल्याचे निरिक्षण नगरविकास विभागाने नोंदविले. त्यापार्श्वभूमिवर गुड मार्निंग पथके नव्याने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. त्या आदेशाचाही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाकडून नव्याने अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असलेली पथके गठित करण्यात न आल्याने ‘ओडी स्पॉट’ वाढले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाºयांकडून वसूल करण्यात येत असलेल्या दंडाच्या कारवाईला मर्यादा आली आहे.घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरामध्ये ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत निर्मितीच्या जागीच कचºयाचे विलगीकरण करुन त्या कचºयावर प्रक्रिया करण्याच्या सुचना नागरी स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने महापालिका , नगरपालिका व नगरपंचायती स्वच्छतेसाठी झगडत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. त्यापार्श्वभूमिवर जे नागरिक स्वच्छतेस सहकार्य करीत नाहीत, त्यांना दंड करणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमिवर घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणाºया व्यक्ती वा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. त्याबाबत महापालिकेने जनजागृतीही चालविली आहे. पहाटे जी वाहने कचरा संकलित करतात, त्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकांवरुन दंडाबाबत नागरिकांना माहिती दिली जाते. प्रत्यक्षात नागरिकांकडून अनेक बाबतीत अस्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे अस्वच्छता करणाºयांकडून १०० ते ५००रुपये व कचरा जाळणाºयांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. नगरविकास विभागाने त्यासंदर्भात ३० डिसेंबरला अधिकृत शासननिर्णय जाहिर करुन महापालिकांना त्याबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आलेत, मात्र या अधिकारांची महापालिका नगरपालिका पुर्ण ताकदीने वापर करीत नसल्याची ओरड आहे.