निवेदिता चौधरी भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:58+5:30

भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवेदिता चौधरी (दिघडे) यांची तर अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी किरण पातुरकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी अभियंता भवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Nivedita Chowdhury BJP's new district president | निवेदिता चौधरी भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्ष

निवेदिता चौधरी भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्ष

ठळक मुद्देशहराध्यक्षपदी किरण पातुरकर : नांदगाव, धारणीचा निर्णय राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवेदिता चौधरी (दिघडे) यांची तर अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी किरण पातुरकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी अभियंता भवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नांदगांव खंडेश्वर व धारणी तालुक्यांचा निर्णय राखीव ठेवण्यात आला. इतर तालुक्यांतील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची घोषणा करण्यात आली. मावळते जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. वाढीव वर्षभराच्या कारकिर्दीसह दोघांनीही चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
दरम्यान धामणगाव तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब शिरपूरकर, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष म्हणून संजय पुनसे, भातकुली तालुकाध्यक्ष म्हणून सोपान गुडधे यांची निवड करण्यात आली आहे.
 

Web Title: Nivedita Chowdhury BJP's new district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.