ट्रॅव्हल्स उलटून नऊ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:33+5:30
चालक मतीन अहमद नाजीर अहमद (५०), संगीता दीपक बिडकर (४२), श्याम बबनराव देशमुख (दोघेही रा. अमरावती), शरद विश्वासराव ढेपे (रा.माजरी मसला), तुषार प्रमोद मोडक, कल्याणी तुषार मोडक (दोघे रा. राजूरवाडी), बळीराम शिवानी गडवे (रा. औरंगाबाद), सुरेश सुखचंद आहुजा (रा. अकोला), जय सुरेश देशमुख (रा. औरंगाबाद), सुरेंद्र अंबादास कावरे (रा.हातुर्णा), अशी जखमींची नावे आहेत.

ट्रॅव्हल्स उलटून नऊ प्रवासी जखमी
बडनेरा : नाशिकहून अमरावतीकडे येणारी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ८ वाजता वरुडा गावानजीकच्या एक्स्प्रेस हायवेवर उलटली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला झोपेची झपकी आल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन उलटल्याची माहिती पुढे आली आहे.
चालक मतीन अहमद नाजीर अहमद (५०), संगीता दीपक बिडकर (४२), श्याम बबनराव देशमुख (दोघेही रा. अमरावती), शरद विश्वासराव ढेपे (रा.माजरी मसला), तुषार प्रमोद मोडक, कल्याणी तुषार मोडक (दोघे रा. राजूरवाडी), बळीराम शिवानी गडवे (रा. औरंगाबाद), सुरेश सुखचंद आहुजा (रा. अकोला), जय सुरेश देशमुख (रा. औरंगाबाद), सुरेंद्र अंबादास कावरे (रा.हातुर्णा), अशी जखमींची नावे आहेत. याशिवात इतर प्रवासीदेखील किरकोळ जखमी झाले आहे. नाशिकहून निघालेली ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २७ बीएक्स १६११ अमरावतीत दाखल होत असताना बुधवार सकाळी बडनेरा हद्दीतील वरूडा गावानजीकच्या एक्स्प्रेस हायवेवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स वरूडा गावानजीक पोहोचली. थेट दुभाजकावर चढून रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. ट्रॅव्हल्सची गती कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्समधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना इर्विन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बडनेरा पोलिसांनी सुरू केली होती.