नऊ मृत्यू, ६७३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:09+5:302021-03-05T04:14:09+5:30
अमरावती : जिल्हात गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५४९ झाली आहे. कोरोनाचे समूह संक्रमण असल्याचे मानण्यात ...

नऊ मृत्यू, ६७३ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्हात गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५४९ झाली आहे. कोरोनाचे समूह संक्रमण असल्याचे मानण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल ९४ रुग्णांचे मृत्यू झाले आहे. असाच ब्लास्ट सप्टेंबर २०२० मध्येही झाला होता. त्यानंतर संसर्ग माघारला होता. यावेळी मात्र, जानेवारीपासूनच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीस लागली व सध्याही रोज उच्चांकी रुग्णांच्या नोंदी होत आहेत. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या २५ हजारांवर पोहोचली आहे. साईनगर, राजापेठ, अर्जुननगर, दस्तूरनगर आदी भागांत एकप्रकारे समूह संक्रमणच असल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र, ही बाब नाकारली आहे. आता संपूर्ण शहरच एक कंटेनमेंट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर याबाबत चर्चेला पेव फुटले आहे.
बॉक्स
गुरुवारचे कोरोनामृत्यू
०००००००००
००००००००००००००
(चार ओळी सोडाव्या)
बॉक्स
चार दिवसांत ३८ बळी
जिल्ह्यात १ ते ४ मार्च याकालावधीत ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्षणे असताना अंगावर आजार काढणे जीवावर बेतण्याची बाब झालेली आहे. याशिवाय को-मॉर्बिड आजारही कोरोना संर्सगात धोक्याचे ठरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार १ मार्च रोजी १०, २ मार्चला १२, ३ मार्चला ७ व ४ मार्चला ९ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झालेले आहेत.