शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

आला रे पंजा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:25 AM

तिकडे तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली अन् इकडे शहर-जिल्हा काँग्रेसजनांना आनंदाचे उधाण आले. अमरावती शहर, तालुका मुख्यालये आणि ग्रामीण भागांत हा आनंद जाहीरपणे साजरा केला गेला.

ठळक मुद्देपडसाद निवडणुकीचे : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मिळालेल्या यशाचा काँग्रेसतर्फे आनंदोत्सव

अमरावती : तिकडे तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली अन् इकडे शहर-जिल्हा काँग्रेसजनांना आनंदाचे उधाण आले. अमरावती शहर, तालुका मुख्यालये आणि ग्रामीण भागांत हा आनंद जाहीरपणे साजरा केला गेला. चार वर्षांपासून सुस्त दिसणाऱ्या काँगे्रस पक्षाला या विजयाने नवसंजीवनी बहाल केल्याचे चित्र सर्वत्र होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसजनांना या उत्साहाचा लाभ होईल, हे निश्चित.राजकमल चौकात जल्लोषमंगळवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होतानाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. निकालाचे चित्र जसजसे स्पष्ट होऊ लागले, तसतसे स्थानिक राजकमल चौकात कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. सकाळी ११ वाजता काँग्रेसने विजयाचा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी झाली. ढोल-ताशांच्या गजरात ‘वा रे पंजा आया रे पंजा...’ असे नारे देण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. यादरम्यान काँग्रेसजनांनी झेंडे हातात घेऊन एकच जल्लोष केला. महिला कार्यकर्त्यांनी नृत्याचा फेर घेतला. मिठाई वाटपाने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवामुळे काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.मात्र, बहुप्रतीक्षेनंतर काँग्रेसजनांसाठी हा आनंदोत्सव असल्याने शहराच्या कानाकोपºयातून कार्यकर्ते राजकमल चौकात एकवटल्याचे चित्र होते. पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील, अशा एकजुटीचे प्रदर्शन आनंदोत्सवातून दिसून आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, ज्येष्ठ नेत्या पुष्पा बोंडे, बबलू शेखावत, विलास इंगोले, देवयानी कुर्वे, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत डवरे, वंदना कंगाले, प्रदीप हिवसे, सुनीता भेले, हफिजाबी युसूफ शाह, शोभा शिंदे, प्रल्हाद ठाकरे, अभिनंदन पेंढारी, अनिल माधोगडिया, राजेंद्र भेले, सलिम बेग, दीपक हुंडीकर, राजेश देशमुख, ओमप्रकाश चांडक, सुरेश रतावा, सलीम मिरावाले, अनिल खडसे, गोपाल हिरवाळे, उत्तमराव भैसने, करिमाबी, जयश्री मरापे, जयश्री वानखडे, अस्मा परवीन, कुंदा अनासाने, आफरीन खान, सुरेश दहातोंडे, सुरेश धावडे, सुधाकर ठाकरे, रवि वानखडे, बबलू वाडेकर, राजेश चव्हाण, देविदास कोल्हे, विश्र्वास तानोडकर, फिरोज खान, प्रकाश नगराळे, पप्पूभाई, योगेश गावंडे, तनवी आलम, नीलेश गुहे, अक्षय भुयार, समीर जवंजाळ , राजा बांगडे, संकेत कुलट, योगेश बुंदिले, सुरेश गायकवाड, प्रशांत महल्ले, राजू भेले, गजानन राजगुरे, आसिफ मन्सुरी, सादीक आयडिया, खालीदभाई, अब्दुल रफीक, अबरार अहमद, सादीक रजा आदींनी काँग्रेसच्या जल्लोषात सहभाग नोंदविला.जिल्हा परिषदेसमोर नेत्यांची थिरकली पावलेअमरावती : राजस्थान, छत्तीगढ, मध्यप्रदेश, मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या भरघोस यशाचा जल्लोष जिल्हा परिषदेसमोर साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे झेंडे हाती घेऊन एकमेकांना पेढे भरविण्यात आले. एरवी कडक भूमिकेत दिसणाºया नेत्यांनी ढोल-ताशांच्या ठेक्यावर ताल धरला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, झेडपी सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंह गैलवार, वासंती मंगरोळे, गजानन राठोड, अभिजित बोके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, राहुल येवले, समीर जवंजाळ, बबलू बोबडे, नीलेश गुहे, अनिकेत जावरकर, शुभम सपाटे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस