बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:30+5:302021-02-24T04:13:30+5:30

अमरावती : बडनेरा ते माहुली चोर या दरम्यान यवतमाळ मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ते अपघातास कारणीभूत ठरणारे आहे. ...

News / Summary | बातमी/ सारांश

बातमी/ सारांश

googlenewsNext

अमरावती : बडनेरा ते माहुली चोर या दरम्यान यवतमाळ मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ते अपघातास कारणीभूत ठरणारे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांची आहे.

-------------------------

जुनी वस्तीत रस्ते निर्मिती सुरू

बडनेरा : येथील जुनी वस्तीत सिमेंट रस्ते चौपदरीकरण वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे काही भागांत रस्ते खोदकाम झाले असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही. रस्ता पार करताना बराच वेळ लागत आहे. रस्ते चौपदीकरणाची कामे वेगाने करावी, अशी मागणी आहे.

----------------------

पॅसेजर गाड्यांची प्रतीक्षा

अमरावती : रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरू केल्या आहे. मात्र, गरीब, सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाही. त्यामुळे रेल्वे मार्गावरील खेड्यांतून शहरात ये-जा करणे महागले आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने एसटीने प्रवास करावा लागत आहे. तो महागडा असल्याची ओरड आहे.

--------------------------------

(फोटो आहे)

रेल्वे स्थानकात कचरा डेपो

अमरावती : येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात नागरिक कचरा आणून टाकत आहेत. संरक्षण भिंतीच्या आत हा कचरा साचून राहत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. कचरा आणून टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रेल्वे सुरक्षा बलाने याकडे लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.