वाचनालयामुळे तरुणांकरिता नव्या संधी
By Admin | Updated: January 5, 2016 00:07 IST2016-01-05T00:07:17+5:302016-01-05T00:07:17+5:30
भिवापूर येथील नवीन वाचनालयामुळे गावातील तरुणांना ज्ञानार्जनात भर पडण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपातळीवर पोहोचण्यास या माध्यमातून मदत होतील,...

वाचनालयामुळे तरुणांकरिता नव्या संधी
किरण गित्ते : भिवापूर येथे ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण
अमरावती : भिवापूर येथील नवीन वाचनालयामुळे गावातील तरुणांना ज्ञानार्जनात भर पडण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपातळीवर पोहोचण्यास या माध्यमातून मदत होतील, असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
भिवापूर गावात ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, सरपंच शालू राठोड, उपसरपंच हृषीकेश आंबेकर, एक्सलन्स ग्रुप पुणेचे अध्यक्ष अरविंद भरडे आणि उपाध्यक्ष कुंजीलाल राठोड आदी उपस्थित होते.
येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत शिक्षण घेतलेले व सध्या पुण्यात प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायी आणि आयटी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या नरेश भरडे यांची संकल्पना आहे. याप्रसगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या २० गावकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
किरण गित्ते पुढे म्हणाले की, नवीन संधी शोधण्यासाठी गावातील तरुण शहरात स्थलांतर करतात. त्यानंतर ते तेथेच स्थायिक होतात व गावाचा कुठेतरी संपर्क तुटतो. मात्र हे वाचनालय सुरू केल्यामुळे गाव आणि शहरातील अंतर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्वत:च्या घरातील पहिल्या माळ्यावर सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करणे ही प्रशंसनीय बाब आहे. या माध्यमातून भिरडे यांनी तरुणांकरिता नव्या संधी निर्माण केली आहे. उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी जगताप म्हणाले, पुस्तके मिळविण्याकरिता गावातील तरुणांना खूप श्रम घ्यावे लागतात. मात्र, या वाचनालयामुळे एमपीएससी व इतर कोर्सेसची तयारी करणाऱ्या मुलांकरिता चांगली संधी उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)