नवे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:09 IST2017-08-22T23:08:43+5:302017-08-22T23:09:05+5:30

आयपीएस चिन्मय सुरेश पंडित यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयात मंगळवारी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळला.

New Commissioner of Police, Chinmay Pundit Ruju | नवे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित रुजू

नवे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित रुजू

अमरावती : आयपीएस चिन्मय सुरेश पंडित यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयात मंगळवारी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याकडे झोन १ ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चिन्मय पंडित हे सन २०१२ मधील आयपीएस रॅन्कचे अधिकारी आहेत. बिड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावातील ते मूळ रहिवासी आहेत.
पोलीस विभागात प्रवेश केल्यानंतर ते सर्वप्रथम कोल्हापूर शहरात रुजू झाले. त्यानंतर रत्नागिरी, नगर येथे व त्यानंतर पदोन्नतीवर ते अपर पोलीस अधीक्षक म्हणून वर्धा येथे गेले. तेथून त्यांची बदली आता अमरावतीत पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.

Web Title: New Commissioner of Police, Chinmay Pundit Ruju