शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

...अन् त्या चिमुकल्यानं डोळे उघडण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 5:41 PM

मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव

- नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : पहिली प्रसूती असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. प्रसूतिकळा सुरू झाल्याने गर्भवतीला चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती होऊ शकत नसल्याचा शेरा डॉक्टरांनी दिला. त्यामुळे अचलपूरच्या रस्त्याने डॉक्टरविना धावणाऱ्या रुग्णवाहिकेत घाटवळणातच तिची प्रसूती झाली. उपचाराअभावी बाळ दगावले. डोके सुन्न करणारा हा प्रकार सोमवारी रात्री घडला. मेळघाटात पुन्हा एका बालकाने डोळे उघडण्यापूर्वी अखेरचा श्वास घेतला. त्या मातेवर आता अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत आहे. यशोदा रामकिसन दहीकर (२२, रा. मोथा) असे आदिवासी मातेचे नाव आहे. तिला २८ जुलै रोजी रात्री ९ च्या दरम्यान प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे सहा किलोमीटरवरील चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  गर्भ पायाळू आहे आणि रुग्णालयात योग्य सुविधांअभावी ही प्रसूती धोकादायक असल्याचे डॉक्टर संजय पवार यांनी सांगितले. ‘१०८’ रुग्णवाहिका अन्य रुग्णास घेऊन गेल्यामुळे ‘१०२’ रुग्णवाहिकाद्वारे तिला रवाना करण्यात आले. डॉक्टरविना धावत असलेल्या रुग्णवाहिकेत आशा आणि नातलग होते. घाटवळणातून आडनदी गावानजीक रुग्णवाहिकेत तिची प्रसूती झाली. एवढेच नव्हे तर पुढे रस्त्यावरील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका वळविण्यात आली. मात्र, तेथे कुणीच डॉक्टर न मिळाल्याने  बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप यशोदाचे पती रामकिसन बाबूलाल दहीकर यांनी केला.

सुविधांचा अभाव; कुठे आहे यंत्रणा अलर्ट?मेळघाटात पावसाळ्यात चार महिने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा शासनाकडून वारंवार केला जात असताना बालमृत्यूचे प्रमाण थांबत नसल्याचे वास्तव आहे. आरोग्यमंत्र्यांनी दौरे करून प्रशासनाला दिलेले निर्देश हवेत विरले आहेत. दुसरीकडे तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालयात पायाळू बालकाची प्रसूती करण्याची सुविधा नसल्याने बालक दगावत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. अशावेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाचा कशासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे

ग्रामीण रुग्णालयात पायाळू बालकाची प्रसूती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पायाळू असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना होती. वेळेपूर्वीच गर्भवतीला दाखल करणे गरजेचे होते. - संजय पवार, वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा 

टॅग्स :Deathमृत्यूAmravatiअमरावती