गोपनीय अहवालासाठी नवीन मूल्यमापन पद्धत
By Admin | Updated: June 15, 2014 23:17 IST2014-06-15T23:17:41+5:302014-06-15T23:17:41+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला

गोपनीय अहवालासाठी नवीन मूल्यमापन पद्धत
अमरावती : जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात अशा प्रकारे वेगळी पद्धत वापरली जात आहे. होय, नाही अशा पद्धतीला संपूर्णपणे फाटा देत शंभर गुणांची एकप्रकारे परीक्षाच घेतली जाणार आहे.
यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात नवीन शिक्षक मूल्यमापन पद्धती तयार करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि इतर कर्मचारी वा अधिकारी यांचा गोपनीय अहवाल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तयार करीत असतात. दरवर्षीच्या प्रमाणे यात होय किंवा नाही असे पर्याय असते. परंतु यातील क्लिष्टता दूर करुन नवीन शिक्षक मूल्यमापन पद्धती अमलात आणण्याचे धोरण जिल्हा परिषदेत सुरु आहे. यासाठी शिक्षक स्वयंमूल्यमापन पद्धत शंभर गुणांची ती राहणार आहे. संबंधित शिक्षकांनी दिलेली प्रश्नावली भरुन द्यावी लागणार आहे. विविध मुद्दे यात राहतील. यात शिक्षक व्यक्तिमत्त्वाला २५ गुण देण्यात येणार अहेत. तसेच इतर ७५ गुण विविध वर्ग अध्यापनासह शालेय उपक्रमाचा यात सहभाग राहणार आहे. शिक्षकाने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले का तसेच वर्ग अध्यापनात नवोपक्रम विषयज्ञान कितपत आहे याची माहिती घेतली जाणार आहे. शिक्षकाने अहवाल भरल्यानंतर केंद्रप्रमुख किंवा वरिष्ठ अधिकारी त्याची तटस्थपणे तपासणी करणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या गुणांकनाची पडताळणी होणार आहे.
शिक्षकाचा अहवाल केंद्रप्रमुख घेतील केंद्रप्रमुखांचा अहवाल विस्तार अधिकारी पाहतील. विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी घेतील, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल शिक्षणाधिकारी घेणार आहेत. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा अहवाल संबंधित मुख्याध्यापक घेतील आणि मुख्यध्यापकांचा अहवाल शिक्षणाधिकारी घेणार आहेत. ही नवी मूल्यमापन पद्धती काही महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.