नवीन अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती विदर्भात
By Admin | Updated: April 12, 2015 00:14 IST2015-04-12T00:14:02+5:302015-04-12T00:14:02+5:30
योजनांवरचा निधी खर्च होत नाही. पर्यायाने तो वापस जातो. योजना रखडतात.

नवीन अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती विदर्भात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनीचे उद्घाटन
अमरावती : योजनांवरचा निधी खर्च होत नाही. पर्यायाने तो वापस जातो. योजना रखडतात. योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे जर रिक्त असतील तर विकास कसा होणार, यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची नियुक्ती व नवीन अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती विदर्भात करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कृषी विकास प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी केली. एकाच भागात राहण्याच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेला फटकार दिली.
यावेळी मंचावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृह व नागरी विकास राज्यमंत्री रणजित पाटील, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, व सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदिले, विष्णू वाघ, रवी राणा, श्रीकांत देशपांडे आदी आमदार उपस्थित होते.
सीसीआयच्या नफ्यात शेतकऱ्यांविषयी हिस्सेदारी
कापसाचा बाजारभाव ३२०० रूपये असताना ४०५० रूपये हमी भावाने कापूस खरेदी करण्यास सीसीआय तयार नव्हती. फरक देण्याचे कबूल केल्यानंतर एक कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली. भाव वाढल्याने फायदा होणार. मात्र घाटा आम्ही सहन केला. त्यामुळे नफ्यात हिस्सेदारी पाहिजे, अशी मागणी केंद्राला केली. ती रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे.