शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

‘स्थायी’त नवे ११ शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 9:58 PM

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती सुचविण्यावरच बुधवारच्या आमसभेत काथ्याकूट करण्यात आले. सभापतींनी स्थायीच्या नव्या शिलेदारांची नावे जाहीर केल्यानंतर आमसभा स्थगीत करण्यात आली.

ठळक मुद्देविवेक कलोतींचा राजीनामा : कार्यवृत्तांवर काथ्याकूट पश्चात आमसभा स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती सुचविण्यावरच बुधवारच्या आमसभेत काथ्याकूट करण्यात आले. सभापतींनी स्थायीच्या नव्या शिलेदारांची नावे जाहीर केल्यानंतर आमसभा स्थगीत करण्यात आली.महापालिकेच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बुधवारच्या आमसभेच्या सुरूवातीलाच सभा स्थगित ठेवण्याचा मूड सत्ताधारी बाकावर होता. सुरूवातील ज्येष्ठ सदस्य मिलिंद चिमोटे यांनी कश्मिर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर मागील सभेतील कार्यवृत्तांत कायम करण्याच्या विषयावर सभागृहात खडाजंगी झाली. मल्टियुटिलिटी वाहन खरेदी व्यवहारात झालेल्या अनियमिततेसंदर्भातील अहवाल सभेत आयुक्त सादर करतील, असे रूलींग मागच्या आमसभेत सभापतींनी दिले होते. त्यानुसार या सभेत हा अहवाल का सादर झाला नाही याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला पत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली. याच मुद्यावरून सलीम बेग युसूफ बेग, अजय गोंडाणे, रासने, धीरज हिवसे यांनी आयुक्तांना विचारणा करून वातावरण तापविण्याच्या प्रयत्न केला. मात्र प्रोसिडींग कायम करताना यामध्ये दुरूस्ती करता येते. मात्र, यावर चर्चा नसावी, असे ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी सुचविले, मिलिंद चिमोटे यांनी हाच सुर आवळला. दोन कोटींचे बिल ३ दिवसांत देता येते, तर यामधील अनियमितता शोधण्याला चार महिने का, असा सवाल अजय गोंडाने यांनी केला. यावर आयुक्तांनी हा अहवाल सादर करण्यास अवधी मागितला. यात १३ विषयांवर स्कोप आॅफ वर्क आहे. यापूर्वी पोद्दार चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर नाही. त्यामुळे १६ कंपोनंटवर चौकशी सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली.चौकशी अहवाल दोषींच्या नावासहीत हवामल्टियुटिलिटी वाहन खरेदी घोटाळ्याचा अहवाल सादर करताना यामध्ये दोषी असणाºयांच्या नावासहीत हवा. यामध्ये दोषी कोण आहेत, याची माहिती आम्हाला आहे. बिल कसे निघाले हेदेखील आम्हाला माहीत आहे. त्यामुळे अहवालात दोषींची नावे यायलाच पाहिजे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात जाऊन आम्हाला आवाज उठवावा लागेल, असे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत म्हणाले. काश्मीर खोºयात शहीद झालेल्या जवानांच्या परिवारास विलास इंगोले व बबलू शेखावत यांनी एक महिन्याचे मानधन देत असल्याचे जाहीर केले.‘स्थायी’ समितीमधील नवे सदस्यगटनेत्यांनी दिलेल्या नावानुसार स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या नावाची घोषणा सभापतींनी केली. यामध्ये भाजपाचे सहा, बीएसपीचे १ व शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. भाजपाचे विजय वानखडे, राजेश साहू, धीरज हिवसे, राधा कुरील, नीता राऊत, प्रकाश बनसोड, शिवसेनेचे भारत चौधरी, बसपाच्या सुगरा रायलीवाले यांचा समावेश आहे. सभापती विवेक कलोती व एमआयएमच्या रूबीना तबस्सुम हारून अली व अब्दूल नजीम अब्दूल रजाक यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी भाजपाचे चेतन गावंडे व एमआयएमचे मो. शाबीर मो. नसीर तसेच राजीया खातून निकरामोद्दीन यांची निवड झाली