नेरपिंगळाई; आखदवाडा शिवारातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:05+5:302021-07-07T04:15:05+5:30

सन २०१९ - २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा झाडे, तूर सोयाबीन, कपाशी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

Nerpingalai; Farmers in Akhadwada Shivara are deprived | नेरपिंगळाई; आखदवाडा शिवारातील शेतकरी वंचित

नेरपिंगळाई; आखदवाडा शिवारातील शेतकरी वंचित

सन २०१९ - २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा झाडे, तूर सोयाबीन, कपाशी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. यात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असताना मौजे आखदवाडा, लिहिदा, वाठोडा, पुसला, बह्यणपूर, नेरपिंगळाई या भागातील शेकडो शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना मदत मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास आमले यांच्या नेतृत्त्वात मौशीचे तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. शेतकरी दरवर्षी काहीना काही संकटाना तोंड देऊन शेती उभी करतो. परंतु कधी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि वन्यप्राणी या संकटात शेती उद्ध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान होते. शेतकरी संकटात सापडतो आणि चिंताग्रस्त होतो आणि यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढते. यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली तर शेतकरी संकटातून सावरू शकतो. ही मदत मिळावी, यासाठी विश्वनाथ आमले, विलास आमले, विनोद राऊत, अंबादास राऊत, राजेंद्र राऊत, अशोक आकोलकर, अजय खंडारकर, संजय माहोरे, कलीम पठाण, सुहास पांडे, रामदास बावने, जनार्दन माहोरे या शेतकऱ्यांनी निवेदने देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.

Web Title: Nerpingalai; Farmers in Akhadwada Shivara are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.